Pregnancy after 30s : वयाच्या 30 नंतर गर्भधारणेचा विचार असेल तर लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Pregnancy : अलीकडच्या काळात गर्भधारणा बाब तेवढी सहज आणि सोपी राहिलेली नाही. अलीकडच्या काळात पुरुष आणि महिलांच्या आरोग्याच्या विविध समस्यांचा गर्भधारणेवर मोठा विपरित परिणाम होतो आहे. महिलांची वयाची 35 वर्षे पूर्ण झाल्यावर नैसर्गिकरित्या गर्भधारणेची क्षमता कमी होते. वयाच्या 35 नंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे ठरते.

Pregnancy problems
गर्भधारणेतील समस्या 
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात गर्भधारणा सोपी राहिलेली नाही
  • पुरुष आणि महिलांच्या आरोग्याच्या समस्या
  • वय वाढल्यानंतर गर्भधारणेशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे

How To Get Pregnant Easily:नवी दिल्ली : गर्भधारणा, मूल होणे ही प्रत्येक कुटुंबातील अतिशय महत्त्वाची बाब असते. लग्नानंतर प्रत्येक जोडपे या गोष्टीला सामोरे जाते. मात्र अलीकडच्या काळात गर्भधारणा (Pregnancy) बाब तेवढी सहज आणि सोपी राहिलेली नाही. अलीकडच्या काळात पुरुष आणि महिलांच्या आरोग्याच्या विविध समस्यांचा गर्भधारणेवर मोठा विपरित परिणाम होतो आहे. बदललेल्या जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम यावर होतो आहे. आजकालच्या काळात करियरमुळे अनेक जोडपी त्यांच्या कुटुंबाच्या विस्ताराला उशिर करतात. तुमच्या माहितीसाठी महिलांमध्ये प्रजनन क्षमता आणि वय हे घटक एकमेकांशी संबंधित असतात. यामुळे महिलांची वयाची 35 वर्षे पूर्ण झाल्यावर नैसर्गिकरित्या गर्भधारणेची क्षमता कमी होते. वास्तविक, शरीरातील अंड्यांचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी झाल्यामुळे असे घडते. या वयात गरोदर राहिल्यास अनेक समस्या (Pregnancy problems) उद्भवू शकतात. जर तुम्ही या वयात मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते. वयाच्या तिशीनंतरच्या गर्भधारणेसंदर्भात जाणून घेऊया. (If you are planning pregnancy after 30s then know this)

अधिक वाचा : Railway Bonus Update : रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस...हाती येणार 78 दिवसांचा अतिरिक्त पगार ; पाहा पूर्ण कॅल्क्युलेशन

वयाच्या 30 नंतर प्रजनन क्षमता कशी वाढवायची-

एका विशिष्ट वयानंतर महिलांच्या शरीरात मोठे बदल होत असतात. वयाच्या 30 वर्षांनंतर एखादी महिला तिच्या शरीरात अंड्यांची संख्या वाढवू शकत नसली तरी काही उपाय करून तुम्ही गर्भधारणा होण्याची शक्यता नक्कीच वाढवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे. वयाच्या 35 नंतर गर्भधारणेचा विचार करत असाल तर  स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे ठरते. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करायला हवेत ते समजून घ्या. 

योग्य आहार- जर गर्भधारणा करायची असेल तर आरोग्य महत्त्वाचे ठरते. त्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. त्यामुळे अतिरिक्त चरबी आणि साखरेचे सेवन टाळा. याशिवाय ताजी फळे आणि भाज्या खा. आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश नक्की करा.

अधिक वाचा :  Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार

अँटिऑक्सिडंट्स समृद्ध अन्न- अँटिऑक्सिडंट पदार्थ महिला आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवू शकतात. या पदार्थांमधील फोलेट आणि झिंक प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे आपल्या शरीरातील शुक्राणू आणि अंडी पेशींना नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स निष्क्रीय करते.

व्यायाम- आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस तुम्ही नक्की व्यायाम केला पाहिजे. दररोज कार्डिओ करणे देखील चांगली कल्पना आहे. तुमचे वजन जास्त असल्यास, वजन कमी करण्याचा विचार करा. तुम्ही निरोगी राहिल्यास तुमची प्रजनन क्षमता वाढेल.

धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा- सिगारेट आणि अल्कोहोल सारख्या पदार्थांचे सेवन तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते, म्हणून त्यांचे सेवन करू नका.

चांगली झोप- झोपेचा प्रजनन क्षमतेवरही मोठा परिणाम होतो. महिलांमध्ये झोप न लागणे आणि वंध्यत्व यांचा खूप मोठा संबंध असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

अधिक वाचा :  मुंबईसाठी तलावांमध्ये 380 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

वैद्यकीय सल्ला- वयाच्या 35 वर्षांनंतर गर्भधारणेचे नियोजन करताना तुम्हाला शरीर तपासणीची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून ते तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतील.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी