Stomach Gas: गॅसच्या समस्येने त्रस्त आहात मग खा हे पदार्थ आणि राहा बिनधास्त!

If you are suffering from gas problem bloating slow digestion then eat these food : खाण्यापिण्याच्या बाबतीत शिस्त पाळली तर गॅसच्या समस्येतून सुटका होऊ शकते. 

slow digestion then eat these food
गॅसच्या समस्येने त्रस्त आहात मग खा हे पदार्थ आणि राहा बिनधास्त!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Stomach Gas: गॅसच्या समस्येने त्रस्त आहात मग खा हे पदार्थ आणि राहा बिनधास्त!
 • जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा अनेकदा गॅसची समस्या त्रास देऊ लागते
 • दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करण्याने शरीराच्या हालचाली कमी होतात

If you are suffering from gas problem bloating slow digestion then eat these food : पोटात गॅस होणे ही समस्या आता अगदी सामान्य बाब झाली आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे, जंकफूड, फास्टफूड, तळलेले पदार्थ खाणे यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. अवेळी जेवणे, चुकीचा आहार घेणे यामुळेही पोटात गॅस होण्याचा त्रास होऊ शकतो. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत शिस्त पाळली तर गॅसच्या समस्येतून सुटका होऊ शकते. 

Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...

जगातील 10 पैकी एकाला होता वर्टिगो आजार, काय आहे हा आजार जाणून घ्या याचे परिणाम

 1. जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा अनेकदा गॅसची समस्या त्रास देऊ लागते. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करण्याने शरीराच्या हालचाली कमी होतात. हे पण पोटात गॅस होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. यावर उपाय म्हणजे शारीरिक हालचाली वाढविणे. 

 2. दिवसाची सुरुवात किमान अर्धा ते एक तास चालणे, धावणे असे व्यायाम करून करावी. 

 3. दररोज सूर्योदयानंतर नाश्ता, दुपारी 12 ते 2 दरम्यान जेवण आणि सूर्यास्ताआधी रात्रीचे जेवण अशा पद्धतीने आहार घ्यावा.

 4. पदार्थ व्यवस्थित चावून आणि सावकाश खावे. शक्यतो जेवत असताना पाणी पिणे टाळावे. प्यायचेच असल्यास मर्यादीत प्रमाणात पाणी प्यावे.

 5. जेव्हा गॅसचा त्रास होतो त्यावेळी पोळी खाण्याऐवजी मर्यादीत प्रमाणात भात अथवा तांदुळाची खिचडी खावी. 

 6. जेव्हा गॅसचा त्रास होतो त्यावेळी मर्यादीत प्रमाणात दही भात खावा.

 7. वारंवार गॅसचा त्रास होत असल्यास जेवताना मर्यादीत प्रमाणात ब्राउन राइस खावा. 

 8. दही शक्यतो दुपारच्या जेवणात आणि मर्यादीत प्रमाणात घ्यावे. 

 9. जे पदार्थ खाल्ल्याने अनेकदा गॅस होतो असे पदार्थ खाणे टाळावे. बटाटे, टोमॅटो, कडधान्ये खाणे टाळावे. तसेच फास्टफूड, जंकफूड, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

 10. नाश्त्याच्या वेळी ताजी फळे खाणे आरोग्यासाठी लाभदायी. पण पोटाशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देत असल्यास आंबट फळे खाणे टाळावे.

 11. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ताज्या भाज्या, प्रामुख्याने हिरव्या भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी