Best Sleeping Position : रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती

If you can't sleep at night then try this simple positons : रात्री झोप येत नसल्यास काही सोप्या कृती कराव्या यामुळे हमखास शांत झोप येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

If you can't sleep at night then try this simple positons
Best Sleeping Position : रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती 
थोडं पण कामाचं
  • रात्री झोप येत नाही मग करा ही सोपी कृती
  • शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची
  • ज्यांना रात्री झोप येत नाही अशांनी रात्री विशिष्ट पद्धतीने झोपण्याचा प्रयत्न करावा

If you can't sleep at night then try this simple positons : रात्री किमान सहा ते आठ तास शांत झोप झाली तर सकाळी माणूस उत्साही असतो. सर्व कामं वेगाने आणि व्यवस्थित करू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण ज्यांना रात्री झोप येत नाही अशांनी काय करावं? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे. रात्री झोप येत नसल्यास काही सोप्या कृती कराव्या यामुळे हमखास शांत झोप येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची आहे. यासाठीच ज्यांना रात्री झोप येत नाही अशांनी रात्री विशिष्ट पद्धतीने झोपण्याचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात शांत झोप येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी तज्ज्ञांनी झोपण्याच्या सोप्या पद्धती (झोपेचे तंत्र) सांगितल्या आहेत. 

  1. कुशीवर झोपा - डाव्या कुशीवर डोळे मिटून पडून राहा. हात, पाय, संपूर्ण शरीर सरळ रेषेत पण सैल सोडा. श्वसनावर लक्ष केंद्रीत करा आणि भोवतालच्या जगाला विसरण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने शांत झोप लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  2. उलटे झोपा - आपण नेहमी ज्या स्थितीत झोपता त्याच्या उलट स्थितीत झोपण्याचा प्रयत्न करा. हात, पाय, संपूर्ण शरीर सरळ रेषेत पण सैल सोडा. श्वसनावर लक्ष केंद्रीत करा आणि भोवतालच्या जगाला विसरण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने शांत झोप लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  3. पाठीवर झोपा - खूप शारीरिक कष्ट करूनही झोप येत नसल्यास पाठ टेकवा वर छताकडे किंवा आकाशाकडे बघून डोळे मिटून घेऊन हात, पाय, संपूर्ण शरीर सरळ रेषेत पण सैल सोडा. श्वसनावर लक्ष केंद्रीत करा आणि भोवतालच्या जगाला विसरण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने शांत झोप लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  4. आरामदायक स्थिती - बिछान्यावर तुम्हाला जी स्थिती आरामदायक वाटते त्या स्थितीत पडून राहा. नंतर डोळे मिटून घेऊन हात, पाय, संपूर्ण शरीर सरळ रेषेत पण सैल सोडा. श्वसनावर लक्ष केंद्रीत करा आणि भोवतालच्या जगाला विसरण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने शांत झोप लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवसभर शरीराला थकविणे यासाठी अंगमेहनत करणे, व्यायाम करणे असे प्रयोग करा. यामुळे रात्री झोप येण्यास मदत होईल. रात्री हलका आहार घ्या. ज्या पदार्थांचे पचन होण्यास वेळ लागेल असे पदार्थ तसेच ज्या पदार्थांमुळे शरीरात पित्त वाढेल (अॅसिडिटी वाढेल) ते पदार्थ रात्री खाणे टाळा. शक्यतो सूर्यास्त होण्याआधी जेवून घ्या. जेवणानंतर शतपावली करा. यामुळे झोप येण्यास मोठी मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी