Weight Loss Tips: पोटाच्या चरबीवर रामबाण उपाय! या पद्धतीने लिंबूचे सेवन केल्यास झपाट्याने वजन होईल कमी

तब्येत पाणी
Updated Jun 10, 2022 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips । वाढलेले वजन फक्त अनेक आजारांनाच आमंत्रण देत नाही तर तुमची पर्सनॅलिटी देखील खराब करत असते. त्यामुळे वजन कमी करणे अथवा नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे वजन कमी करण्यासाठी लिंबू तुमची मदत करू शकतो.

If you consume lemon in this way, you will lose weight fast
या पद्धतीने लिंबूचे सेवन केल्यास झपाट्याने वजन होईल कमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाढलेले वजन फक्त अनेक आजारांना आमंत्रण देत नाही तर तुमची पर्सनॅलिटी देखील खराब करत असते.
  • लिंबूमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात.
  • लिंबू पाण्याचे सेवन पोटाला दीर्घकाळासाठी भरलेले ठेवते.

Weight Loss Tips । मुंबई : वाढलेले वजन फक्त अनेक आजारांनाच आमंत्रण देत नाही तर तुमची पर्सनॅलिटी देखील खराब करत असते. त्यामुळे वजन कमी करणे अथवा नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे वजन कमी करण्यासाठी लिंबू तुमची मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त याचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहिती असली पाहिजे. तत्पुर्वी, जाणून घेऊया नेमकं वजन कशामुळे वाढते? दरम्यान यामागे प्रमुख तीन कारण असण्याची शक्यता आहे. एक म्हणजे अनियंत्रित आहार, दुसरे म्हणजे चुकीची जीवनशैली आणि तिसरे म्हणजे शारीरिक हालचाल न करणे. (If you consume lemon in this way, you will lose weight fast). 

अधिक वाचा : मध्य रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक

आरोग्य तज्ञ म्हणतात की, ज्या लोकांचे वजन वाढते त्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करण्याचा धोका असतो. यामध्ये डायबिटीज, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. लिंबूचे सेवन केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून वजन कमी करण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये लिंबूला खूप महत्त्व आहे. वजन कमी करण्यासाठी लिंबू सर्वात प्रभावी औषधांपैकी एक आहे. 

अधिक वाचा : पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

लिंबू कसे वजन कमी करतो

आरोग्य तज्ञ म्हणतात की, लिंबूमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. याचे पाणी पिल्याने केवळ शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होत नाही तर वजन देखील सहजपणे कमी होते. याशिवाय हे स्नायूंना टोनिंग करण्यासाठी देखील मदत करते. लिंबूपाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत करते. त्यात पोटॅशियम असते, जे पाण्याचा भार कमी करून रक्तदाब नियंत्रित करते आणि शरीराला हायड्रेट ठेवते. 

यापद्धतीने वजन होईल कमी

लिंबू पाण्याचे सेवन पोटाला दीर्घकाळासाठी भरलेले ठेवते. एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते आणि त्यामुळे सतत भूक देखील लागत नाही. साहजिकच सतत भूक न लागल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

या पद्धतीने लिंबूचे सेवन केल्यास झपाट्याने वजन होईल कमी

  1. रोज सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस करून प्या.
  2. लिंबू पाण्यामध्ये तुम्ही मध देखील मिसळून पिऊ शकता. 
  3. काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी