Ginger tea : हिवाळ्यात आल्याचा चहा पीत असाल तर सावधान, या गंभीर आजारांना पडू शकता बळी!

Ginger tea : आल्याचा चहा जास्त प्रमाणात पिणे शरिरास हानिकारक ठरू शकते. आल्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तेव्हा हिवाळ्यात आल्याचा चहा पिताना काळजी घ्या.

If you drink winter tea, beware, you can fall victim to these serious diseases!
आल्याचा चहा पिताना जरा जपून, आजारांना द्याल निमंत्रण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आल्याचा चहा पिताना सावधगिरी बाळगा
  • जास्त प्रमाणात आल्याच्या चहाचे सेवन करू नका
  • रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते

Ginger tea : नवी दिल्ली: आल्याचा चहा बहुतेक लोकांना आवडतो. हिवाळ्यात तर प्रत्येकालाच आल्याचा चहा हवाहवासा असतो. केवळ घरातल्यांनाच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आल्याचा चहा खूप आवडतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आल्याच्या चहाचे जास्त सेवन करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्ही आजारीही पडू शकता.

ginger tea benefits: Should you drink ginger tea everyday?

चहामध्ये केवळ आलेच नव्हे तर वेलचीचाही अधिक प्रमाणात वापर केल्यास, तेही आरोग्यासाठी हानिकारक ठरते. पण जर तुम्हाला आल्याचा चहा आवडत असेल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे माहित असणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती दिवसभरात पाच ग्रॅम आले खाऊ शकते. पण यापेक्षा जास्त आल्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आल्याची आवड असेल तर जरा सावध राहा.


जास्त आल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. याशिवाय पोटात जळजळही होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, जास्त आल्याचे सेवन केल्याने निद्रानाशेची समस्या उद्भवू शकते. यासोबतच अँसिडिटीची समस्याही होऊ शकते. आल्याचा जास्त चहा घेतल्यास पोटात गॅस तयार होतो.

दुसरीकडे, ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा बीपीची तक्रार आहे, त्यांनी योग्य प्रमाणात आले घेणे फायदेशीर ठरते. दुसरीकडे, ज्यांचे बीपी कमी आहे, 
त्यांनी तर आल्यापासून दूर राहणंच उत्तम आहे. खरंतर आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांचं बीपी आणखी कमी होऊ शकतो. 

parenting tips in marathi: गर्भावस्थेत किती कप आल्याचा चहा प्यावा? - Maharashtra Times


यासोबतच आल्याचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांनी याकडे दुर्लक्ष करावे. त्यांनी त्याचे जास्त सेवन करणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे हायपोग्लायसेमियाची स्थिती उद्भवू शकते. जर तुम्ही आल्याचा चहा पीत असाल तर एक कप चहामध्ये एक चमचा आले पुरेसे आहे.

भरपूर प्रोटीन घ्या

प्रोटीनयुक्त डाएट घेतल्याने वजन नियंत्रणात येते. विना एक्सरसाईज आणि डाएटिंगशिवाय तुम्ही वजन कमी करू शकता. खासकरून नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त डाएटचा अधिक वापर करा. जसे मासे, अंडी, बीन्स आणि दह्याचा आपल्या जेवणात समावेश करा. 

अधिकाधिक पाणी प्या

वजन कमी करण्यापासून शरीर निरोगी राखण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. दिवसभरात ७-८ ग्लास पाणी प्या. पाणी पिण्याचे तसे अनेक फायदे आहेत. मात्र वेट लॉस रूटीनममध्ये पाण्याला विशेष स्थान आहे. पाणी शरीराला हायड्रेट करण्यासोबतच भूक कमी करण्यातही मदत करते. निरोगी व्यक्तीने सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्यायल्याने शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते.  रात्री उशिरा आणि कार्बोहायड्रेटयुक्त जेवण हे आपत्तीसारखे आहे. यामुळे रात्रभर इन्सुलिनची पातळी जास्त राहील. जर तुम्हाला रात्री उशिरा जेवायचे असेल तर ते कमीत कमी ठेवा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी