Side Effects Of Mango: जास्त प्रमाणात आंबा खात असाल तर वेळीच सावध व्हा, होऊ शकते हे नुकसान

तब्येत पाणी
Updated Apr 23, 2022 | 09:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mango Overeating: आंबा हा फळांचा राजा असून उन्हाळ्यात प्रत्येकजण त्याची वाट पाहत असतो. आंबा जेवढा चविष्ट असतो तेवढाच जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरालाही हानी पोहोचते.

If you eat too much mango, be careful in time, it can cause damage
अतिप्रमाणात आंबा खाल्ल्यास शरीराला त्रासदायक ठरू शकते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंब्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे अन्यथा नुकसान होऊ शकते.
  • जास्त आंबा खाल्ल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढते
  • आंब्यामध्ये कॅलरी आणि फायबर जास्त असते

Side Effects Of Mango For Health:  उन्हाळ्यात फळांमध्ये सर्वाधिक आंब्याची लोक वाट पाहत असतात. आंबा हा फळांचा राजा आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. आंबा न आवडणारे फार कमी लोक असतील. नाहीतर आंब्याचे नाव घेताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा उन्हाळ्यात येतो आणि याच मोसमात सर्वाधिक खाल्ला जातो. आंबा चवीष्ट असून त्यात अ, क आणि ड जीवनसत्त्वांसह अनेक पोषक घटक आढळतात. काही लोकांना आंबा इतका आवडतो की खाण्यापूर्वी ते विचार करत नाहीत आणि खात राहतात. मात्र हा आंबा आपल्या शरीराला हानीसुद्धा पोहोचवतो. 

आंबा संतुलित प्रमाणात खावा. जास्त आंबा खाल्ल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढते. आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. ते शरीरासाठी हानिकारक आहे. त्याच्या सेवनामुळे वजन झपाट्याने वाढते आणि व्यक्ती लठ्ठपणाची शिकार बनते.

फोड, मुरुम, पुरळ समस्या

आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर फोड, पिंपल्स, मुरुमे बाहेर पडतात. त्यामुळे आंबा पुरेशा प्रमाणात खावा. ज्यांना आधीच मुरुमांच्या समस्येने त्रस्त केले आहे, त्यांनी आंबा फार कमी प्रमाणात खावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

आंब्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही चवीसाठी ते जास्त खाल्ले तर तुम्हाला जुलाब आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. यासोबतच काही लोकांच्या शरीरात अॅलर्जी देखील होते. आंब्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे चांगले.


मधुमेहाच्या रुग्णासाठी हानिकारक आहे


आंबा खाल्ल्याने शुगर पेशंटला सर्वाधिक त्रास होतो. आंब्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या रुग्णाने आंबा फार कमी प्रमाणात खावा.

( Disclaimer : या लेखातील टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत.व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. )


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी