Energy Boosting Foods: थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा

तब्येत पाणी
Updated Apr 22, 2022 | 11:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Energy Boosting Foods: थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा. शरीरातील थकवा आणि अशक्तपणा केळी, रताळं, प्रथिनं, फळं, ड्रायफ्रुट्समुळे दूर करता येऊ शकतो.

If you feel tired and weak then include these 5 foods in your diet
थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी करा हे उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या, बदाम आणि अंजीर यांचा समावेश करा.
  • प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दूध, अंडी आणि मासे यांचा समावेश करा

Energy Boosting Foods: आयुष्य इतकं वाढलंय की वेळ कळत नाही. कामामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो.अयोग्य आहार, झोपेचा अभाव आणि तणाव यामुळे आपल्याला नेहमी थकवा जाणवतो. अशा स्थितीत लोकांना अनेकदा अशक्तपणा जाणवतो. काही लोकांच्या शरीरात हा अशक्तपणा काही काळासाठी असतो तर काही लोकांच्या दीर्घकाळापर्यंत हा अशक्तपणा शरीरात राहतो

शरीरातील थकवा आणि अशक्तपणाची अनेक कारणे आहेत, जसे की शरीरात पोषक तत्वांची कमतरता, तणाव किंवा नैराश्य, वृद्धत्व, आळस, जीवनसत्त्वांची कमतरता, विशेषत: व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आणि कोणत्याही मोठ्या आजारामुळे अशक्तपणा येऊ शकतो. 


तुम्हालाही सतत थकवा जाणवत असेल आणि अशक्त वाटत असेल, तर सर्वप्रथम तुमचा आहार सुधारा. आहारात काही खास पदार्थांचा समावेश करा, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि तुम्ही निरोगी राहता. 

चला अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर होईल.


आहारात कॅल्शियम आणि प्रथिनांचा समावेश करा : 

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या, बदाम आणि अंजीर यांचा समावेश करा. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात दूध, अंडी आणि मासे यांचा समावेश करा


केळ्यामुळे थकवा दूर होईल : 

शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी केळीचे सेवन करा. तुम्ही सकाळी नाश्त्यात केळीचे सेवन करू शकता.
केळी त्वरित ऊर्जा देते आणि शरीरातील कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता देखील पूर्ण करते.


रताळ्याचे सेवन करा: 

शरीरातील थकवा दूर करण्यासाठी रताळं चांगलं आहे. हे लोहयुक्त अन्न रक्तपेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे.पोषक तत्वांनी भरपूर असं रताळं शरीराला ऊर्जा देण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

हंगामी फळे खा: 

अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी हंगामी फळे खा. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.विटामिन बी12 असलेली फळे आणि भाज्यांच्या सेवनाने स्नायूंची कमकुवतता, थकवा दूर होतो.


सुक्या मेव्याचे सेवन करा : 

शरीरात अशक्तपणा आणि थकवा आल्याने त्रास होत असेल तर आहारात सुक्या फळांचे सेवन करा. अँटिऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेले सुकी फळ शरीराला त्वरित ऊर्जा देतात. सुक्या मेव्याचे कमी सेवन केल्याने स्नायू दुखणे आणि थकवा दूर होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी