Hands Legs Tingling: तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येतात? मग या जीवनसत्त्वाची आहे कमतरता

Health Tips : विविध आजारांबरोबर हल्ली हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही सर्वत्र आढळणारी समस्या झाली आहे. बऱ्याचवेळा जर तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ बसून राहिल्यास अनेकांना मुंग्या येण्याची (Sensation In Body Parts:)समस्या उद्भवते. मात्र हा त्रास जर सारखा होत असेल किंवा वारंवार तुमच्या हातापायांना किंवा शरीरात मुंग्या येत असतील तर ते मोठ्या आजाराचे कारण बनू शकते.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • अलीकडे आरोग्याच्या अनेक समस्या दिसतात
  • हाता पायाला मुंग्या येण्याची तक्रार
  • जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजार

Deficiency of Vitamins in body :नवी दिल्ली : अलीकडच्या काळात आरोग्याच्या (Health)अनेक समस्या दिसत आहेत. विविध आजारांबरोबर हल्ली हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही सर्वत्र आढळणारी समस्या झाली आहे. बऱ्याचवेळा जर तुम्ही एकाच स्थितीत बराच वेळ बसून राहिल्यास अनेकांना मुंग्या येण्याची (Sensation In Body Parts)समस्या उद्भवते. मात्र हा त्रास जर सारखा होत असेल किंवा वारंवार तुमच्या हातापायांना किंवा शरीरात मुंग्या येत असतील तर ते मोठ्या आजाराचे कारण बनू शकते. शरीरात होणाऱ्या छोट्या-छोट्या बदलांकडे आपण लक्ष दिले पाहिजे कारण त्यामागे काहीतरी कारण असते. अनेकदा आपल्या शरीरात योग्य पोषक घटकांची कमतरता असते. त्यासाठी शरीर अशा लक्षणांद्वारे आपल्याला सुचित करत असते. तुमच्या शरीरात कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता (Deficiency of Vitamins) आहे, तुम्ही कोणते पोषक घटक घेतले पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया. (If you have Sensation In Body Parts then there is a deficiency of these vitamins)

अधिक वाचा : साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट 

मुंग्या येणे
अनेकदा खूप वेळ बसल्यानंतर पायाला किंवा हाताला गुदगुल्या होतात किंवा संवेदना येतात. याला बरेच लोक याला मुंगी चावणे असेही म्हणतात. यामध्ये एकाच स्थितीत बसल्याने शरीरातील विविध भागात रक्ताभिसरण नीट होत नाही. परिणामी शरीरात मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते.

मुंग्या येण्यामागचे कारण 
खूप वेळ एकाच स्थितीत बसल्याने मुंग्या येणे हे तर नेहमीचेच आहे. मात्र सतत जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण आहे. जर तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या असेल तर तुम्ही चाचणी करून घ्या. तुमच्या आहारात ज्या जीवनसत्त्वांची कमतरता असेल त्यावर लक्ष देत योग्य तो आहार घ्या. 

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

व्हिटॅमिन बी कशातून मिळतो
शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणात व्हिटॅमिन बी असतात. जर तुम्ही मांसाहार खात असाल तर तुमच्या आहारात मांस, मासे, चिकन यांचा समावेश करा. त्याउलट जर शाकाहारी असाल तर तुम्ही संपूर्ण धान्य, बीन्स, मसूर, बटाटे किंवा सुका मेवा घेऊ शकता. हे सर्व ब जीवनसत्त्वांचे चांगले स्रोत आहेत. दुग्धजन्य पदार्थांमधूनदेखील व्हिटॅमिन बी चांगले मिळते. शाकाहारी लोक रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स घेऊ शकतात. हेदेखील चांगल्या पोषक घटकांचे स्त्रोत आहेत. तुम्ही वनस्पती तेल, सूर्यफूल तेल, सीफूड आणि किडनी बीन्सचादेखील आहार समावेश करू शकता.

अधिक वाचा : Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

व्हिटॅमिन ई कशात असते
ड्राय फ्रुट्स किंवा सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय आहारात अॅवोकॅडोचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत असतो. त्याचप्रमाणे बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात असते. सूर्यफूल बिया आणि तेल देखील व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत असतात. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी