Benefits of cinnamon milk : दुधात हा पदार्थ टाकून प्यायल्यास दूर होतील चेहऱ्यावरील पुळ्या अन् नाकातील सर्दी

दालचिनीचा वापर खोकल्यावरील उपचारांसाठी फायदेशीर आहे. खोकल्याचा त्रास असलेल्यांनी सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा दालचिनी पावडर 2 चमचे मधासोबत सेवन करावे. त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. दालचिनीच्या पानांचा डेकोक्शन बनवा. 10-20 मिली घेतल्यास खोकला बरा होतो.

Benefits of cinnamon milk
दुधात हा पदार्थ टाकून प्यायल्यास दूर होतील चेहऱ्यावरील पुरळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पचनसंस्थेचे विकार, दात आणि डोकेदुखी, त्वचा रोग, मासिक पाळीच्या समस्या दालचिनीच्या सेवनाने बरे होतात.
  • दालचिनी कोणत्याही रोगावर इलाज नाही. पण रोग टाळण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
  • दालचिनीचा वापर उलट्या थांबवण्यासाठीही केला जातो.

नवी दिल्ली :  दालचिनी जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात (kitchen) सहज आढळते. हा एक मसाला (spice) आहे, ज्याचा उपयोग केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर औषध (medicine) म्हणूनही केला जातो.  या कारणास्तव, टाइम्स नाऊ मराठीच्या या लेखात, आम्ही दालचिनीचे (cinnamon) फायदे सांगत आहोत. दालचिनी एखाद्या व्यक्तीला निरोगी (healthy) आणि रोगांपासून संरक्षित ठेवत असते. पण वाचकांनो हे लक्षात घ्या की, दालचिनी कोणत्याही रोगावर इलाज नाही. पण रोग टाळण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत होऊ शकते.  (If you put this substance in milk and drink it, facial lines and colds in the nose will go away)

अधिक वाचा  : दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, सेमीफायनलमध्ये कोण खेळणाार

दालचिनीचे घरगुती उपाय काय आहेत आणि दालचिनी खाण्याचे फायदे

पचनसंस्थेचे विकार, दात आणि डोकेदुखी, त्वचा रोग, मासिक पाळीच्या समस्या दालचिनीच्या सेवनाने बरे होतात. यासोबतच जुलाब, क्षयरोगातही याचा उपयोग फायदेशीर ठरतो. दालचिनी वापरण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे तुम्ही वेळेवर दालचिनी वापरण्याचा फायदा देखील घेऊ शकता.

उचकी लागत असेल तर 

(हिचकी) उचकी ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे नेहमी उचकीची तक्रार करतात. असे लोक दालचिनी वापरू शकतात. दालचिनीचा 10-20 मिली डेकोक्शन प्या. यामुळे आराम मिळतो.

भूक वाढवण्यासाठी 

500 मिलीग्राम शुंथी पावडर, 500 मिलीग्राम वेलची आणि 500 ​​मिलीग्राम दालचिनी बारीक करा. सकाळी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी घेतल्याने भूक वाढते.

अधिक वाचा  : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते चविष्ट गुळाची चपाती

उलट्या थांबवण्यासाठी 

दालचिनीचा वापर उलट्या थांबवण्यासाठीही केला जातो. दालचिनी, आणि लवंगा यांचा एक decoction करा. 10-20 मिली प्रमाणात घेतल्यास उलट्या थांबतात.

डोळे लपकणे 

बरेच लोक तक्रार करतात की त्यांचे डोळे सतत लटकत असतात. दालचिनीचे तेल डोळ्यांवर (पापण्यांवर) लावा. त्यामुळे डोळ्यांची लपक होणं  थांबते आणि दृष्टीही वाढते.

अधिक वाचा  : पांड्याची जबरदस्त खेळी, इंग्लंडला जिंकायला हव्यात 169 धावा

दातदुखीपासून आराम 

ज्या लोकांना दातदुखीची तक्रार आहे, त्यांना दालचिनीचा फायदा होऊ शकतो.  दालचिनीचे तेल कापसाच्या साहाय्याने दातांवर लावा. यामुळे आराम मिळेल. 5-6 दालचिनीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यामुळे दात स्वच्छ आणि चमकदार होतात.  

डोकेदुखीपासून आराम 

डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दालचिनीचे सेवन करा. 8-10 दालचिनीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. दालचिनीची पेस्ट डोक्यावर लावल्याने थंडी किंवा उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो. आराम मिळाल्यानंतर, पेस्ट धुवून टाका. दालचिनीच्या तेलाने कपाळाला मसाज करा. त्यामुळे गार लागत असते, यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.

सर्दीमध्ये दालचिनीचा वापर

दालचिनी पाण्यात बारीक करून, गरम करा आणि  ती पेस्ट लावा. सर्दीपासून आराम मिळतो. दालचिनीचा रस काढून डोक्याला लावल्यानेही फायदा होतो.

खोकला होता बरा 

दालचिनीचा वापर खोकल्यावरील उपचारांसाठी फायदेशीर आहे. खोकल्याचा त्रास असलेल्यांनी सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा दालचिनी पावडर 2 चमचे मधासोबत सेवन करावे. त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. दालचिनीच्या पानांचा डेकोक्शन बनवा. 10-20 मिली घेतल्यास खोकला बरा होतो. एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध मिसळा. दिवसातून तीन वेळा याचे सेवन केल्याने खोकला आणि जुलाबापासून आराम मिळतो.

बहिरेणा दूर करते दालचिनी 

बहिरेपणा हा एक आजार आहे ज्यामुळे जीवन कठीण होते. बहिरेपणाच्या उपचारातही दालचिनी फायदेशीर आहे. यासाठी दालचिनीच्या तेलाचे 2 थेंब कानात टाका. बहिरेपणात फायदा होत असतो. 

पचनक्रियेत सुधारणा 

गॅसच्या समस्येपासून मुक्ती तर मिळेलच, पचनक्रियाही चांगली होईल. दुधासोबत दालचिनीचा वापर केल्यास पचनक्रिया सुधारून तुमच्या पचनाच्या समस्या दूर होतात.
 

झोपेसाठी उपयोगी 

जर झोप न येण्याची समस्या असेल तरही हा फॉर्म्युला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे दूध प्या आणि काळजी न करता शांत झोपा.दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ओळखली जाते. टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधासह त्याचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच  दुधासोबत दालचिनीचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यासोबतच सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्यांवरही मात करता येते.

सौंदर्य खुलते 

सर्वात सर्वोत्तम फायदा तुमच्या त्वचेवर दिसून येतो. अ‍ॅन्टी फंगल आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्सचा त्रास आटोक्यात ठेवण्यास हे दूध मदत करते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी