Blood Pressure: तुम्हालाही होतोय हाय ब्लडप्रेशरचा त्रास? आजपासूनच ही फळे खायला करा सुरूवात

तब्येत पाणी
Updated May 09, 2022 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Diet chart for blood pressure । आजच्या धावपळीच्या जीवनात हाय ब्लड प्रेशरची समस्या सामान्य झाली आहे. याचे कारण खराब जीवनशैली आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्या देखील येऊ लागल्या आहेत.

If you suffer from high blood pressure, start eating this fruit
तुम्हालाही होतोय हाय ब्लडप्रेशरचा त्रास? तर ही फळे खा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजच्या धावपळीच्या जीवनता हाय ब्लड प्रेशरची समस्या सामान्य झाली आहे.
  • रताळे हे कंदमुळ बीपी नियंत्रित करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.
  • केळीमध्ये बीपी नियंत्रित करण्याचे सर्व गुणधर्म असतात.

Diet chart for blood pressure । मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात हाय ब्लड प्रेशरची (High blood pressure) समस्या सामान्य झाली आहे. याचे कारण खराब जीवनशैली (lifestyle) आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा (heart attack) झटका आणि ब्रेन स्ट्रोक (brain stroke) सारख्या समस्या देखील येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्याच्या टिप्सची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आज आपण अशा काही फळांबद्दल (Fruits) भाष्य करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या हाय ब्लड प्रेशरची (BP) समस्या दूर होण्यास मदत होईल. (If you suffer from high blood pressure, start eating this fruit). 

अधिक वाचा : सोन्याच्या भावात घसरण! लग्नसराईत घ्या फायदा, पाहा ताजा भाव

BP ग्रस्त रूग्णांसाठी ही ५ फळे (Fruits for blood pressure patient)

 किवी (Kiwi) - हाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांनी फळाच्या स्वरूपात किवीचा समावेश करणे आवश्यक आहे. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. किवीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळतात, जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचे काम करतात. त्याचा रस रोज प्यायल्याने हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही टळतो.

Kiwi

 टरबूज (Watermelon) - हे फळ बीपी रूग्णांसाठी देखील खूप फायदेशीर आहे कारण त्यात अमिनो ॲसिड, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लाइकोपीन सारखे पोषक घटक आढळतात. हे सर्व रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय रोजचा व्यायाम देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. फळांचा राजा आंबा चव आणि आरोग्य दोन्ही देतो. याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. 

Watermelon

 स्ट्रॉबेरी (Strawberry) - स्ट्रॉबेरीचे फळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि त्यात व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड देखील आहेत. यामध्ये असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Strawberry,

केळी (Banana)  - केळीमध्ये बीपी नियंत्रित करण्याचे सर्व गुणधर्म असतात, पोटॅशियम, ओमेगा ३, फॅटी ॲसिड्स, फायबर इत्यादी पोषक तत्व केळीमध्ये आढळतात. त्यामुळे याचे सेवन करणे आरोग्यासाठीही चांगले असते. 

banana

रताळे (Sweet potato) - रताळे हे कंदमुळ बीपी नियंत्रित करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. त्यात बीटा कॅरोटीन, कॅल्शियम आणि विरघळणारे फायबर असते, जे तणाव कमी करते, ज्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

sweet potato

दही देखील फायदेशीर 

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फळांव्यतिरिक्त तुम्ही दहीही खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १२ मुबलक प्रमाणात आढळतात, जे बीपी नियंत्रित करण्यात मदत करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी