Healthy Lifestyle: 100 वा वाढदिवस साजरा करायचा असेल तर आहारात करा बदल, जाणून घ्या कोणते पदार्थ खावे अन् कोणते नाही

तुम्हाला 100 वर्षांचे दीर्घ आणि निरोगी आयुष्य (Life) जगायचे आहे का? दीर्घायुष्य (Longevity) आणि निरोगी आयुष्य (Healthy life) अशा दोन गोष्टी आहेत, ज्या कदाचित जगातील प्रत्येक व्यक्तीला हव्या असतात.

If you want to celebrate your 100th birthday, change your diet
100 वा वाढदिवस साजरा करायचाय? मग आहार बदला  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आपण काय खातो आणि काय खात नाही यावर आपले आरोग्य आणि रोगविरहित जीवन अवलंबून असते.
  • तुमच्या आहारात मध्यम ते जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा.
  • दीर्घायुष्यासाठी तुम्ही भरपूर फळ भाज्या, सर्व प्रकारची धान्ये, भाज्या आणि काही प्रमाणात मासे यांचा आहारात समावेश केला पाहिजे.

Healthy lifestyle tips for long Life: नवी दिल्ली :  तुम्हाला 100 वर्षांचे दीर्घ आणि निरोगी आयुष्य (Life) जगायचे आहे का? दीर्घायुष्य (Longevity) आणि निरोगी आयुष्य (Healthy life) अशा दोन गोष्टी आहेत, ज्या कदाचित जगातील प्रत्येक व्यक्तीला हव्या असतात. हे दोन्ही साध्य करणे आपल्या हातात आहे. आपण काय खातो आणि काय खात नाही यावर आपले आरोग्य (Health) आणि रोगविरहित जीवन अवलंबून असते. अन्नावर वेळोवेळी अनेक संशोधने झाली आहेत. चला तुम्हाला अशाच एका संशोधनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत..

तपशीलवार संशोधन 

हे संशोधन UNIVERSITY OF SOUTHERN CALIFORNIA के प्रोफेसर VALTER LONGO और ROZALYN ANDERSON ने केलं आहे. 
NUTRITION संदर्भात केलेले सर्व अभ्यास आणि संशोधन तपासल्यानंतर, योग्य आहार दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी कोणता आहार असेल हे समजतं. या संशोधनानुसार, जेवणात एक नाही तर अनेक गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही दीर्घायुषी आणि रोगविरहित आयुष्य मिळवू शकता.
अन्नामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, किती कॅलरीज (CALORIE) चं सेवन कराययचं आहे. किती वेळ आणि किती वेळा उपवास (FASTING) करायचा आहे, यासर्व गोष्टीवर विस्तृतपणे यात सांगण्यात आले आहे.  

दीर्घायुष्यासाठी काय खावे?

या संशोधनातून असे समोर आले आहे की तुमच्या आहारात मध्यम ते जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. शरीरासाठी आवश्यक तेवढेच प्रथिने घ्या. या प्रथिनांचा मोठा भाग अशा अन्नातून घेतला पाहिजे जो आपल्याला वनस्पती आणि झाडांपासून मिळतो. त्याचप्रमाणे, वनस्पतींमधून अन्न खाल्ल्याने मिळणारा FAT शरीराला आवश्यक असलेली 30% ऊर्जा पुरवतो. प्रोफेसर लोंगो (LONGO) स्पष्ट करतात की दीर्घायुष्यासाठी तुम्ही भरपूर फळ भाज्या, सर्व प्रकारची धान्ये, भाज्या आणि काही प्रमाणात मासे यांचा आहारात समावेश केला पाहिजे. आपल्या प्लेटमधून लाल मांस पूर्णपणे काढून टाका. पांढरे मांस फार कमी प्रमाणात खाल्ले जाऊ शकते. साखरेचे प्रमाण कमी ठेवा. काजू, बदाम, अक्रोड यासारखे ड्रायफ्रूट्स चांगल्या प्रमाणात खावेत आणि काही प्रमाणात डार्क चॉकलेटचाही आहारात समावेश करावा. 

उपवास देखील आहे आवश्यक

संशोधनात असे म्हटले आहे की, 11 ते 12 तासांच्या दरम्यान, दिवसातील सर्व मांस खाल्ले पाहिजे जेणेकरून उर्वरित 12 तास उपवास करता येतील म्हणजेच उर्वरित दिवस काहीही खाऊ नये. यासोबतच दर 3-4 महिन्यांत 5 दिवस उपवास केल्यास आजार होण्याचा धोका कमी होतो.

केवळ तज्ञांच्या देखरेखीखाली आहार बदला

या संशोधनात काय खावे, पण किती खावे, हे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळेच प्रोफेसर लोन्गो म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने या संशोधनात सांगितलेला दीर्घायुषी आहार आपल्या आरोग्य आणि वय लक्षात घेऊन अवलंबला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आहारतज्ञांच्या देखरेखीखाली स्वतःच्या देखरेखीनुसार या आहाराचे नियोजन करावे. हळूहळू अंगीकारता येणारे छोटे बदल करण्यापेक्षा तुमच्या सध्याच्या आहारात ताबडतोब छोटे बदल करणे चांगले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी