Tulsi Milk Benefits: आपण सर्वजण दूध पिण्याच्या फायद्यांबद्दल जागरूक आहोत. दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची (nutritious) खाण मानलं गेलंय. दूध (Milk ) प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. दूध हे पौष्टिकतेची मोठी संपन्न खाण आहे. उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व (vitamin) 'ब' च्या व्यतिरिक्त दुधात कॅल्शियम (Calcium), जीवनसत्त्व 'ड' असते जे हृदय सुदृढ राखतात आणि आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.
दुधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. हे घटक मिळत असल्याने दुधाला उगाच संपूर्ण अन्न म्हटलं जात नाही. दुधातील हे सर्व प्रकारचे पोषक घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. अशा स्थितीत तुळशीची पाने दुधात उकळून प्यावीत. स्टोन आणि किडनीचा त्रास दूर होतो.
Read Also : या बायकांपासून दूर राहण्यास सांगताय चाणक्य, जाणून घ्या कारण
दुधाचे फायदे वाढवण्यासाठी आपण त्यात अनेक गोष्टी मिसळतो. दुधात हळद टाकली तर त्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. परंतु त्यातील एक पर्यायापैकी एक म्हणजे तुळशीची पाने दुधात टाकणं. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. भारतातील बहुतेक घरांमध्ये तुळशी आढळते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, तुळशीची पाने दुधात उकळून प्यायल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. दमा हा फुप्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो. जर तुम्हाला दमा किंवा श्वसनाचा त्रास होत असेल तर यापासून बचाव करण्यासाठी तुळशीची पाने दुधात उकळून प्या. हे केल्याने दम्याच्या रुग्णाला खूप आराम मिळतो.
Read Also : Team India विजयावर शरद पवारांचं जबरदस्त सेलिब्रेशन
सध्याच्या काळात मायग्रेनच्या येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. या आजाराने पीडित लोकांनी तुळस आणि दुधाचे नियमित सेवन केल्यास ही समस्या मुळापासून नाहीशी होऊ शकते.
व्यस्त जीवनशैली, कार्यालयीन कामाचा ताण, कौटुंबिक कलह, प्रेम आणि मैत्रीतील विश्वासघात, कर्ज यामुळे लोक अनेकदा नैराश्याला बळी पडतात. अशा वेळी तुळशीच्या दुधाचे सेवन केल्याने सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात आणि तणावही दूर होतो.
आजकाल दूषित अन्न खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या वाढली आहे. किडनीतील खडे खनिजे आणि मीठ यांच्या संयोगाने तयार होतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. कधी-कधी हे छोटे-छोटे दगड आपल्या टॉयलेटमधून बाहेर पडतात, पण कधी-कधी ते मोठे असल्यामुळे ऑपरेशन करून काढावे लागतात. जर तुम्हाला किडनी स्टोनचा काही त्रास जाणवत असेल तर तुळशीची पाने दुधात उकळून प्यावीत. स्टोन आणि किडनीचा त्रास दूर होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. औषधांचा अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)