Weight Loss: Kareena Kapoorसारखी झिरो फिगर मिळवायची असेल तर खा 'या' बिया; लोण्यासारखी वितळेल अतिरिक्त चरबी

Seeds For Weight Loss: झिरो फिगरसाठी तुम्हाला  बिया खाव्या लागतील. या निरोगी बियांमध्ये असलेले पोषक तत्व एकीकडे शरीराला पूर्ण ऊर्जा देतात आणि दुसरीकडे वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी कोणते बिया फायदेशीर ठरू शकतात ते जाणून घेऊया.

If you want to get zero figure like Kareena Kapoor
Kareena Kapoorसारखी झिरो फिगर मिळवायची असेल तर खा 'या' बिया  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या बियांमध्ये भरपूर फायबर असते आणि ते चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात.
  • वेट लॉससाठी अळशीच्या बियांची स्मूदी म्हणजेच फालुदा सारखं पदार्थ बनवा.
  • सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने कॅलरीज जलद बर्न होतात

Seeds For Weight Loss: प्रत्येक मुलीला आपलं शरीर (body)करिना कपूरच्या (Kareena Kapoor) झिरो फिगर (Zero figure) सारखं असावं, असं वाटत असतं. अनेकजण लठ्ठपणाला त्रासले असून यापासून सुटका व्हावी याकरिता अनेक उपाय केले जातात. आज आम्ही तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्याचा एक उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला अधिकची मेहनत घेण्याची गरज नाहीये.  ( If you want to get zero figure like Kareena Kapoor, eat 'these' seeds)

अधिक वाचा  : IPL Auction 2023 Sold players: 'या' प्लेअर्सला लागली लॉटरी

झिरो फिगरसाठी तुम्हाला  बिया खाव्या लागतील. या निरोगी बियांमध्ये असलेले पोषक तत्व एकीकडे शरीराला पूर्ण ऊर्जा देतात आणि दुसरीकडे वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी कोणते बिया फायदेशीर ठरू शकतात ते जाणून घेऊया.

अळशी  बिया 

अळशीच्या बिया वजन कम करण्यासाठी उपयुक्त आहेत. प्रथिने, लोह आणि फायबरने समृद्ध असलेल्या या बिया साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. वेट लॉससाठी अळशीच्या बियांची स्मूदी म्हणजेच फालुदा सारखं पदार्थ बनवा आणि तसेच त्याचे तुम्ही ज्यूस बनवू शकतात. 

अधिक वाचा  : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या मराठीतून शुभेच्छा

खरबूजच्या  बिया 

खरबूजच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या बियांमध्ये भरपूर फायबर असते आणि ते चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात.

सूर्यफूल बिया

सूर्यफुलाच्या बिया वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्येही मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळत असते. सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन कमी होते.

अधिक वाचा  : सिक्कीममध्ये ट्रक दरीत कोसळून 16 जवान शहीद

चिया सीड्स

चिया बिया चरबीयुक्त लोकांसाठी वरदान आहेत. चिया बिया फायबरचा चांगला स्रोत आहेत. ते भूक नियंत्रित करतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.  चिया बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात असते.

भांगच्या बिया

भांगाच्या बिया योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्यात प्रभावी ठरतात. या बियांमध्ये प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी