नवी दिल्ली : बदललेल्या जीवनशैलीमुळे जाडेपणा आणि लठ्ठपणा सारख्या समस्या अनेकांना येत आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करत असतात. कोणी जीमला जॉइन करत डाएट प्लान ठरवत असतात. परंतु या डाएटमध्ये ते अनेक फळांचा देखील समावेश करत असतात. पण अशी काही फळे देखील आहेत जी वजन कमी करण्याऐवजी वाढवतात. डायटिंग करताना ही फळे खाऊ नयेत.
वजन कमी करताना अननसाचे सेवन करू नये. अननस खूप गोड आहे. यामध्ये मिळणाऱ्या कॅलरीजमुळे तुमचे वजन कमी करणे कठीण होऊ शकते.
केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी करणे कठीण होईल. केळीमध्ये भरपूर कॅलरी आणि भरपूर नैसर्गिक साखर असते. एका केळीमध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. अशा स्थितीत दिवसातून २-३ केळी खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आंबा खाऊ नये. तुम्ही आंब्याच्या 1-2 काप खाऊ शकता, यापेक्षा जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते. आंब्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात.
वजन कमी करताना तुम्ही जास्त कॅलरी असलेली फळे खाऊ नयेत. त्यात एवोकॅडो देखील आहे. एवोकॅडो हे निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहे.
द्राक्षे- द्राक्षे साखर आणि चरबीने भरलेली असतात. त्यामुळे वजन कमी करताना द्राक्षे कमी प्रमाणात खावीत. जर तुम्ही 100 ग्रॅम द्राक्षे खाल्ले तर त्यात 67 कॅलरीज आणि 16 ग्रॅम साखर असते.