नवी दिल्ली : जेव्हा-जेव्हा वजन कमी (Weight loss) करण्यासाठी हेल्दी ड्रिंकची (Healthy drink) चर्चा होते तेव्हा नेहमीच देशी पदार्थांचे नाव घेतले जाते. उन्हाळ्याच्या ऋतूबद्दल बोलायचे झाले तर या गरम हंगामात ताक म्हणजेच बटर मिल्क (Butter milk) हा उत्तम पर्याय मानला जातो. हे थंडगार दही, पाणी आणि जिरे आणि पुदिना सारख्या मसाल्यांचे एक स्वादिष्ट मिश्रण आहे, जे तुम्हाला उष्माघाताशी लढण्यास आणि तुमचे पचन सुधारण्यास मदत करेल. आयुर्वेदानुसार दुपारच्या जेवणानंतर ताक सेवन करणे चांगले कारण ते पचवण्यास सोपे असते. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी ते टाळले पाहिजे कारण ते वात आणि पित्त वाढवू शकते, ज्यामुळे शरीरात असंतुलन होऊ शकते. ताक अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात इतर काही घटक टाकू शकता. चला जाणून घेऊया त्याविषयी-