आपल्यालाही करायचा आहे कोरोनापासून बचाव, तर हे व्यायाम करत राहणे आहे गरजेचे

तब्येत पाणी
Updated May 01, 2021 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका संशोधनात असे समोर आले आहे की कोरोनाचा हल्ला आळशी लोकांवर होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यांचा मृत्यू ओढवण्याचीही शक्यता त्यांच्यात जास्त असते. त्यामुळे शारीरिक हालचाली अतिशय आवश्यक आहेत.

People with masks
आपल्यालाही करायचा आहे कोरोनापासून बचाव, तर हे व्यायाम करत राहणे आहे गरजेचे  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 50 हजार लोकांवर केले गेले संशोधन
  • हे आहेत या संशोधनाचे निष्कर्ष
  • असे झाले हे संशोधन

नवी दिल्ली - जगभरात (World) कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेने (second wave) थैमान घातले आहे. काही देशांमध्ये परिस्थिती फारच वाईट आहे, ज्यात भारताचाही (India) समावेश आहे. गेल्या 24 तासात साधारण 1.85 लाख नवबाधित आढळले आहेत. दुसरीकडे एका संशोधनात (research) असे समोर आले आहे की कोरोनाचा हल्ला (corona attack) आळशी लोकांवर (lazy people) होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यांचा मृत्यू (death) ओढवण्याचीही शक्यता जास्त आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली (physical activities) अतिशय आवश्यक आहेत. योगा (Yoga), व्यायाम (exercises), दोरीच्या उड्या (skipping), पायऱ्या चढणे (climbing), सायकलिंग (cycling) यामुळे आपण यापासून वाचू शकता.

50 हजार लोकांवर केले गेले संशोधन

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या या संशोधनात साधारण 50,000 लोक सहभागी होते. एका अहवालानुसार कमी व्यायाम करणाऱ्यांमध्ये लक्षणे गंभीर आहेत तर मृत्यूचा धोकाही जास्त आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की जे लोक शारीरिकरित्या सक्रीय नाहीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येण्यासोबतच जास्त देखभालीचीही गरज असते. यात असा निष्कर्ष निघाला आहे की कोरोना हा फक्त धूम्रपान करणाऱ्या, मधुमेह किंवा जाडेपणा किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्यांवरच हल्ला करत नाही, तर कमजोर रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांनाही याचा धोका असतो.

हे आहेत या संशोधनाचे निष्कर्ष

  • 15 टक्के लोकांनी ते निष्क्रीय (दर आठवड्याला शारीरिक हालचाली 0.10 मिनिटे) असल्याची माहिती दिली.
  • 80 टक्के लोकांच्या हालचाली 11.49 मिनिटे दर आठवडा असल्याची माहिती दिली.
  • 07 टक्के लोकांनी राष्ट्रीय आरोग्य दिशानिर्देशांनुसार स्वतःला तंदुरुस्त ठरवले.
  • रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता असलेल्या 2 टक्क्यांपेक्षा जास्त युवकांमध्ये लठ्ठपणा होता.
  • 73 टक्क्यांपेक्षा जास्त असे होते जे शारीरिकरित्या अनफिट होते.
  • अशा रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 2.5 पट जास्त होती.

असे झाले हे संशोधन

व्यायामाच्या कमतरतेमुळे गंभीर संसर्ग, रुग्णालयात दाखल होणे, आयसीयूत ठेवावे लागणे आणि मृत्यूची शक्यता वाढते का हे तपासण्यासाठी संशोधकांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2020दरम्यान कोरोनाचा धक्का बसलेल्या संयुक्त राज्यांमधील 48,440 व्यक्तींची माहिती घेतली. यांचे सरासरी वय 47 होते आणि 5पैकी तीन या महिला होत्या. लठ्ठपणाच्या पातळीच्या थोडे वर असलेल्या या लोकांचे मास-बॉडी इंडेक्स 31 होता. यापैकी जवळपास अर्ध्या लोकांना काहीही आजार नव्हता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी