Immunity boosting vegetables: ओमिक्रोनचा सामना करण्यासाठी पालेभाज्या ठरतायत इम्युनिस्टी बूस्टर

तब्येत पाणी
Updated Jan 22, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Immunity boosting vegetables | मागील जवळपास दोन ते तीन वर्षांपासून अवघ्या जगावर कोरोना व्हायरसचे संकट ओढवले आहे. प्रत्येकजण या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या शरिरावर अधिक लक्ष देत आहे. सोबतच इम्युनिटी पॉवर वाढवण्यावर भर देत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यासाठी काहीजण खिशाला न परवडणारी रक्कम देखील खर्च करत आहेत. मात्र या खर्चाला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत त्या रोजच्या वापरातील पालेभाज्या.

Immunity boosting vegetables Leafy greens are effective in counteracting the effects of corona omicron virus
ओमिक्रोनचा सामना करण्यासाठी पालेभाज्या फायदेशीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाचा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रोनचा सामना करण्यासाठी पालेभाज्या फायदेशीर.
  • हिरव्या पालेभाज्या इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे काम करतात.
  • पालेभाज्या इम्युनिटी बुस्टरचे काम अधिक चांगल्या प्रकारे करतात.

Immunity boosting vegetables | नवी दिल्ली : मागील जवळपास दोन ते तीन वर्षांपासून अवघ्या जगावर कोरोना व्हायरसचे (Covid-19) संकट ओढवले आहे. प्रत्येकजण या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या शरिरावर अधिक लक्ष देत आहे. सोबतच इम्युनिटी पॉवर (Immunity Power) वाढवण्यावर भर देत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यासाठी काहीजण खिशाला न परवडणारी रक्कम देखील खर्च करत आहेत. मात्र या खर्चाला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत त्या रोजच्या वापरातील पालेभाज्या (Vegetables). कारण या पालेभाज्या अधिक खर्चिक पदार्थांपेक्षा खूप फायदेमंद आहेत, त्यांचे सेवन केल्याने इम्युनिटी पॉवर वाढण्यास अधिक मदत होते. लक्षणीय बाब म्हणजे त्या कमीत कमी खर्चात उपलब्ध होतात. दरम्यान या पालेभाज्यांचे सेवन केल्याने कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ओमिक्रोनचा (Omicron Variant) देखील सामना करण्यास मदत होते. या घातक विषाणूविरूध्द लढण्यासाठी इम्युनिटी पॉवर (immune system boosting) वाढण्यास मदत होते. (Immunity boosting vegetables Leafy greens are effective in counteracting the effects of corona omicron virus). 

अधिक वाचा: 'या' जेष्ठ गायिकेचे निधन

दरम्यान, हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र अनेक लोक यांचे सेवन करण्यास नकार दर्शवतात. सत्यस्थिती म्हणजे आजच्या धावपळीच्या दुनियेत हिरव्या भाज्या खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या जेवणात हिरव्या भाजांचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. तर ओमिक्रोनसारख्या वेगाने पसरणाऱ्या साथीच्या रोगाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवून त्याचा सामना करण्यास मदत होते. 

पालेभाज्या ओमिक्रोनवर प्रभावशील 

लक्षणीय बाब म्हणजे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपली प्रतिकारशत्ती वाढवणे हा सर्वात मोठा उपाय असल्याचे सुरूवातीपासूनच तज्ञ मंडळींनी सांगितले होते. त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी लोक नाना प्रकारचे खर्चीक उपाय करताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये काढ्याचे सेवन, सुपरफूड यांसह विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र त्याला अपवाद म्हणून आपल्या रोजच्या वापरातील काही पालेभाज्या यावर अधिक फायदेमंद आहेत. त्या भाज्या इम्युनिटी बूस्टरचे काम अधिक चांगल्या प्रकारे करतात. कारण हिरव्या पालेभाज्या या नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर असून भाज्यांचा हिरवा रंग हा क्लोरोफील असून तो हिमोग्लोबिनच्या सामान आहे. महत्त्वाचे म्हणजे भाज्यांमध्ये जिंक, आयरन, व्हिटॅमिन यांसह पोषक तत्त्वांसह मिनरल आढळून येतात. वरील सर्व घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. 

ब्रोकोली (Brocoli) 

ब्रोकोली ही शरीरासाठी उपयुक्त असून या भाजीत व्हिटॅमिन ए, के, सी फोलेट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. लक्षणीय बाब म्हणजे हे घटक इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ब्रोकली भाजीच्या रोजच्या सेवनाने शरीरात कैरोचीनची मात्रा वाढून कॅन्सरसारख्या घातक आजाराशी सामना करण्यास फलदायी ठरते. 

पालक (Spinach)

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, जिंक, आयरन मोठ्या प्रमाणात आढळते. यासोबतच अँटीअँक्सीडेन्ट आणि बीटा कैरोटीन हे दोन्ही घटक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे पालक भाजीचे सेवन केल्यास शरीराला फायदा मिळतो. तर कमी प्रमाणात शिजवलेली पालक भाजी अधिक फायदेशीर ठरते. 

शिमला मिरची (Capsicum)

शिमला मिरची फायबर, अँटीअँक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन सी चा एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त भाग आहे. एक कप कापलेल्या शिमला मिरचीत १९० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. जे रोजच्या व्हिटॅमिन सी च्या गरजेपेक्षा तीन पट अधिक आहे. 

संपूर्ण हिरव्या पाले-भाज्या (Green Vegetables)

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संपूर्ण हिरव्या असलेल्या पालेभाज्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यामध्ये अँटीअँक्सीडेन्ट, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भाजीच्या स्वरूपात पाले-भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेमंद ठरत इम्युनिटी बूस्टर वाढवण्याचे काम करत असतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी