Vitamin B12 : व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे शरीराचा होतो 'सांगडा'... येतात अनेक व्याधी, जाणून घ्या

Health Tips : व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) हा असाच एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे शरीरातील मज्जा पेशींना निरोगी राहते. या व्हिटॅमिनचा उपयोग शरीरातील लाल रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यात होतो. महत्त्वाचे म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी 12 तयार होत नाही. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते. यासंदर्भात विस्ताराने जाणून घ्या.

Vitamin B12
व्हिटॅमिन बी 12 
थोडं पण कामाचं
  • शरीरात व्हिटॅमिन बी 12 महत्त्व
  • बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक आजार
  • ही कमतरता कशी दूर करावी

Vitamin B12 Deficiency : नवी दिल्ली : आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) हा असाच एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे शरीरातील मज्जा पेशींना निरोगी राहते. या व्हिटॅमिनचा उपयोग शरीरातील लाल रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यात होतो. महत्त्वाचे म्हणजे शरीरात व्हिटॅमिन बी 12 तयार होत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार (Healthy Food) घेणे आवश्यक आहे. आहारात योग्य पदार्थांचा समावेश न केल्यास शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता (Vitamin B12 Deficiency) होऊ शकते. व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आणि ती कशी दूर करायची ते पाहूया. (Importance of Vitamin B12 and effects of Vitamin B12 Deficiency)

अधिक वाचा : Shocking CCTV: हॉर्न वाजवल्याचा राग; कार चालकांकडून बाईकस्वाराला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

व्हिटॅमिन बी 12 आणि त्याच्याशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे-

व्हिटॅमिन बी 12 किती हवे

तज्ज्ञांच्या मते आपल्या शरीराला दररोज सुमारे 2.4 mcg व्हिटॅमिन B12 ची गरज असते. खास करून ज्या स्त्रिया गरोदर आहेत किंवा स्तनपान करत आहेत, त्यांना व्हिटॅमिन बी 12 ची जास्त गरज असते. तर मुलांसाठी व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण वयानुसार बदलते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा परिणाम

हा शरीरातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे याच्या कमतरतेमुळे अनेक व्याधींची समस्या उद्भवते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अॅनिमियासारख्या गंभीर आजारांचा धोका राहतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरातील ताकद कमी होते. परिणामी थकवा किंवा अशक्तपणा, मळमळ, उलट्या किंवा अतिसार, भूक न लागणे, वजन कमी होणे अशा बाबी उद्भवतात. याशिवाय तोंड किंवा जीभ दुखणे, त्वचा फिकट होणे, हातपाय सुन्न होणे, दृष्टी कमी होणे यासारख्या समस्यादेखील उद्भवतात.

अधिक वाचा : Dombivli: डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिटॅमिन बी 12 कसे मिळवायचे

शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, जसे की दही आणि चीज, प्रथिने यांचे सेवन करणे योग्य ठरते. यातून व्हिटॅमिन बी 12 सह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला पुरवठा शरीराला होतो. एक कप दुधात 240 मिली व्हिटॅमिन बी 12 असते. हे प्रमाण दैनंदिन गरजेच्या 46% असते. पनीरमध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते. 22 ग्रॅम पनीरमध्ये व्हिटॅमिन बी12 ची 28% गरज पूर्ण होते.

शाकाहारी लोकांन व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा-

व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटकांपैकी आहे. हे पेशींसाठी आवश्यक जीवनसत्व आहे. मज्जातंतू, रक्तपेशी आणि डीएनए निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये हे जीवनसत्व असते. याशिवाय मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ याचे चांगले स्त्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी 12 चे महत्त्व

शरीरात व्हिटॅमिन बी 12ची अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकते. यातून रक्ताचीदेखील कमतरता निर्माण होऊ शकते. शाकाहारांनी त्यांचे व्हिटॅमिन बी 12 कुठून येत आहे याबद्दल अधिक विचार करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या काही शाकाहारी स्त्रोतांमध्ये दूध आणि चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी 12 ची शरीरातील कमतरता पूर्ण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते.  

1 कप कमी फुल क्रीम दुधात 1.2 मायक्रोग्रॅम किंवा 50% (DV).
8 औंस फुल क्रीम दहीमध्ये 1.1 mcg, किंवा DV च्या 46%
स्विस चीजच्या 1 औंसमध्ये 0.9 एमसीजी किंवा 38% डीव्ही
नाश्त्यात दही, दुपारच्या जेवणात दूध आणि स्नॅक म्हणून कॉटेज चीजचे काही तुकडे वापरून पहा.

अधिक वाचा : Supriya Sule : शरद पवारांनी गांधी घराण्याच्या वारसावर आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही सांगितला, सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला 

तृणधान्य

व्हिटॅमिन बी 12 समृध्द अन्न दैनंदिन गरज पूर्ण करण्यास मदत करते. हे शाकाहारी लोकांसाठी B12 चे सहज उपलब्ध स्त्रोत आहेत. फोर्टिफाइड तृणधान्ये हा एक चांगला नाश्ता पर्याय आहे. त्यात अनेकदा 25% B12 असू शकतात. 

यीस्ट
यीस्ट तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. व्हिटॅमिन बी 12 असलेले आणखी एक पौष्टिक अन्न म्हणजे पौष्टिकदृष्ट्या समृद्ध यीस्ट. हा शाकाहारी लोकांचा आवडता पदार्थ आहे. बरेच लोक पदार्थांना चव येण्याची पौष्टिक यीस्ट वापरतात.

फोर्टिफाइड न्यूट्रिशनल यीस्टचा एक चमचा 2.4 mcg B12 पुरवतो. शाकाहारी सॉस, मिरची किंवा करीमध्ये यीस्ट घालू शकतात. 

शिटेक मशरूम
मशरुम हे अतिशय पौष्टिक असते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. शिटेक  सारख्या काही मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12 असते. मात्र, त्यात व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असते. व्हिटॅमिन बी 12 च्या गरजा पूर्ण करण्यासाठी 50 ग्रॅम वाळलेल्या शिटेक मशरूमचे सेवन केल्यास फायदा होतो.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी