Remedies for Good Digestion : पचनशक्ती सुधारण्यासाठी करा हे उपाय, पोट होईल एकदम OK

योग्य आहार घेऊनही अनेकांना पोटाच्या तक्रारी उद्भवतात. अपचन, पित्त, गॅस, जळजळ अशा तक्रारींवर मात करण्यासाठी आहाराची आयुर्वेदानं सांगितलेली योग्य पद्धत समजून घेणं गरजेचं आहे.

Remedies for Good Digestion
पोटाच्या आरोग्यासाठी हे उपाय करा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • गॅस, अपचन, पित्तावर आयुर्वेदात आहेत सोपे उपाय
  • रोजच्या जेवणात असावी दही घातलेली कोशिंबीर
  • पचनशक्ती सुधारण्यासाठी जिरे, मोहरी उपयुक्त

Remedies for Good Digestion | आपलं आरोग्य नीट राखण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. मात्र तरीही काही ना काही आरोग्याच्या तक्रारी उपटतच असतात. बहुतांश आजाराचं मूळ हे पोटात असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असतात. त्यामुळे तब्येत ठणठणीत राखायची असेल, तर पोटाचं आरोग्य सांभाळणं अधिक महत्त्वाचं आहे. खाण्यापिण्यात आपल्याला अनेक अशा गोष्टींचा समावेश करावा लागतो, ज्यामुळे आपलं पचन नीट होईल आणि आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. मात्र तरीही अनेकदा पित्त, अपचन, ढेकर येणं, पोट फुगल्यासारखं वाटणं यासारखे त्रास अनेकांना होतात.

डाएटसोबत नियोजनही महत्त्वाचं

पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासठी कुठले पदार्थ खायला हवेत, हे अनेकांना माहित असतं. त्यानुसार ते ते पदार्थ खाल्लेही जातात. मात्र तरीही अपचन, पित्त, गॅस यासारखे विकार होतच असतात. सगळं काही नीट खाऊनही असं का होतंय, हे आपल्याला समजत नाही. यावरचं उत्तर आयुर्वेदात सापडतं. काय खावं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते कधी खावं यालाही महत्त्व आहे. यातील दुसऱ्या गोष्टीचं भान अनेकांना नसतं. त्यामुळे चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या क्रमानं काही पदार्थ खाल्ले जातात आणि आपल्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम झाल्याचं दिसतं. त्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले काही नियम जाणून घेेऊया आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करता येईल, ते पाहूया. 

अधिक वाचा - Fruits for high Uric Acid : रक्तातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खा ही पाच फळं, स्वस्तातली फळं खाऊन टळतील गंभीर आजार

आयुर्वेदाचे नियम

पचनशक्ती सुधारण्यासाठी दही घातलेली कोशिंबीर खाणं गरजेचं आहे. यामुळे पोट थंड राहतं. अनेकजण जेवणासोबतच दह्याची कोशिंबीर खातात. मात्र याचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर जेवण झाल्यावर काही वेळानं दह्याची कोशिंबीर खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

जेवताना मोबाईल वापरण्याची अनेकांना सवय असते. मात्र त्यामुळे शरीराचं योग्य प्रकारे पोषण होत नाही. जेवताना जिरे आणि हिंग यांची फोडणी दिलेलं ताक प्यायल्यास शौचाच्या सर्व समस्या दूर होतात.

  • जेवणानंतर बडीशेप आणि साखर एकत्र करून खाल्ल्यामुळे पचनक्रिया जलद व्हायला मदत होते. त्रिफळा चूर्ण खाल्ल्यामुळेही पोट साफ होतं. 
  • जेवणापूर्वी लिंबू रस घेऊन त्यात आलं किसून टाकावं. वरून काळं मीठ घालावं. हे मिश्रण रोज जेवणापूर्वी घेतलं, तर पोटाशी संबंधित बहुतांश विकार दूर होतात. 
  • पचनाची समस्या दूर करण्यासाठी रोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असलेले पदार्थ असतील, याची काळजी घेणं गरजेचं आहे. ड्रायफ्रूट्स, ओट्स, दलिया यांचा नियमित आहारात समावेश केला तर अपचनाची समस्या लवकर दूर होऊ शकेल. 
  • नियमित आणि सात्विक आहार घेणे हाच पोट साफ ठेवण्याचा आणि सर्व विकारांना पळवून लावण्याचा उत्तम मार्ग आहे. अर्थात, तुम्हाला पोटाशी संबंधित गंभीर आजार असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार आहाराचं नियोजन करणं गरजेचं आहे.

अधिक वाचा - पोटाच्या विकारांपासून हृदयविकारावर लाभदायी आहे गवार, जाणून घ्या गवार खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी