Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी 1 महिना अगोदर शरीर देते हे संकेत...ही 11 लक्षणे दिसली तर लगेच व्हा सावध

Heart Attack : ह्रदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू होतो आहे. सर्वसाधारण समज असा आहे की हार्ट अटॅक ही एक अचानक घडणारी घटना आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नसून ह्रदयविकाराचा झटका हा आधी एका धक्क्याने सुरू होतो. अचानक यात काही होत नाही. मात्र ह्रदयविकाराच्या झटक्यासंदर्भातील अनेक लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅक येण्याआधी 1 महिन्यापूर्वीपासूनच त्याची लक्षणे किंवा संकेत दिसायला लागतात.

Heart Attack
हार्ट अटॅक 
थोडं पण कामाचं
 • ह्रदयविकाराचा झटका अचानक येत नाही
 • एक महिनाआधीपासूनच शरीर देते सिग्नल
 • हार्ट अटॅकची महत्त्वाची लक्षणे

Heart Attack Important Signs : नवी दिल्ली : अलीकडच्या ह्रदयविकार  हा गंभीर आजार मोठ्या प्रमाणात सर्वत्र आढळतो आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने (Hear Attack) अनेकांचा मृत्यू होतो आहे. सर्वसाधारण समज असा आहे की हार्ट अटॅक ही एक अचानक घडणारी घटना आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नसून ह्रदयविकाराचा झटका हा आधी एका धक्क्याने सुरू होतो. अचानक यात काही होत नाही. मात्र ह्रदयविकाराच्या झटक्यासंदर्भातील अनेक लक्षणांकडे (Symptoms of heart attack) लोक दुर्लक्ष करतात. अलीकडेच यासंदर्भात एक महत्त्वाचा अभ्यास झाला आहे. यात 500 पेक्षा जास्त महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार हार्ट अटॅक येण्याआधी 1 महिना आधीपासूनच शरीर त्यासंदर्भातील धोक्याचे संकेत देत असते. 
(Important symptoms that appears before 1 month of heart attack)

अधिक वाचा : कतारमधील यंदाच्या FIFA World Cup काय आहे खास? वाचा

काय अभ्यास करण्यात आला

जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार,  ह्रदयविकाराचा झटका अचानक येत नाही. हार्ट अटॅक येण्याआधी 1 महिन्यापूर्वीपासूनच त्याची लक्षणे किंवा संकेत दिसायला लागतात. हा अभ्यास हार्ट अटॅकने वाचलेल्या 500 पेक्षा जास्त महिलांवर करण्यात आला होता. यातील 95 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी सांगितले की त्यांना एक महिन्यापासूनच काही लक्षणे दिसली. या लक्षणांमध्ये अनेकांनी थकवा येणे हे सांगितले. तर 48 टक्के महिलांनी झोपेची समस्या आल्याचे सांगितले. याशिवाय काही महिलांनी छातीत दुखणे, छातीत दाब, वेदना जाणवणे, छातीत ताण जाणवणे ही लक्षणे जाणवल्याचे सांगितले.

अधिक वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

हृदयविकाराची महत्त्वाची लक्षणे (Symptoms of heart attack)-

 1. थकवा जाणवणे
 2. झोप समस्या
 3. अपचन होणे
 4. चिंता वाटणे
 5. हृदय धडधडणे
 6. हात कमकुवत / जड होणे
 7. विचार किंवा स्मृती मध्ये बदल
 8. दृष्टीमध्ये बदल होणे
 9. भूक न लागणे
 10. हात आणि पायांना मुंग्या येणे
 11. रात्री श्वास घेण्यात अडचण येते

हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे -

 1. लठ्ठपणा
 2. मधुमेह
 3. वाढलेले कोलेस्टरॉल
 4. वाढलेला बीपी
 5. धूम्रपान आणि जास्त मद्यपान
 6. जास्त चरबीयुक्त आहार

तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ह्रदयविकाराचा झटका टाळण्यासाठी निरोगी, संतुलित आहार घ्या. त्याचबरोबर प्रक्रिया केलेले, साखरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करा. तसेच नियमित व्यायाम करा, वजनावर नियंत्रण ठेवा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका. 

अधिक वाचा  : मनुक्याचे पाणी मिळवू देऊ शकते या 4 आजारांपासून मुक्ती

सीपीआर कसे द्यायचे

तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आढळल्यास, तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी तुमच्या जवळच्या हॉस्पिटलशी संपर्क साधा. मात्र जर एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला प्रथमोपचार मिळणे आवश्यक असते. शरीरात रक्त प्रवाह राखण्यासाठी किंवा पुनर्संचयित करण्यासाठी कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) सुरू करा. वेळीच दिलेला सीपीआर रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराच्या पहिल्या काही मिनिटांत जर सीपीआर केले गेले तर रुग्णाच्या जगण्याची शक्यता दुपटीने वाढते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी