Diabetes Control : वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर 100-125mg/dl असेल तर आहे मधुमेहाचा धोका...पाहा कसे कराल नियंत्रण

Health Tips : आता अगदी तरुण वयातदेखील मधुमेह (Diabetes) होतो आहे. भारतात तर जगातील सर्वाधिक मधुमेहाचा रुग्ण आढळत आहेत. ताणतणाव, जीवनशैलीतील चुकीचे बदल यामुळे या आजाराचा झपाट्याने विस्तार होतो आहे. यात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. यावर नियंत्रण न ठेवल्यास इतर अवयवांनादेखील इजा पोचवू शकते. त्यांची कार्यक्षमता कमी होते.

Diabetes control
मधुमेहावर नियंत्रण 
थोडं पण कामाचं
  • चाळीशीनंतर रक्तातील साखरेवर ठेवा नियंत्रण
  • भारतात मधुमेहाचा प्रमाण वाढले
  • रक्तातील साखर नियंत्रणात कशी ठेवाल

How to control Fasting Blood Sugar Level :नवी दिल्ली : अलीकडच्या काळात ज्या आजारांनी प्रत्येक घरात काळजीचे वातावरण निर्माण केले आहे त्यातील एक म्हणजे मधुमेह. जीवनशैलीतीबदल बदल आणि चुकीच्या आहारामुळे मधुमेहाचा आजार होतो. हा एक अतिशय गंभीर आजार असून यात रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood sugar level) वाढते. पूर्वी हा आजार वृद्धांचा किंवा एका विशिष्ट वयानंतरचा मानला जायचा. मात्र आता अगदी तरुण वयातदेखील मधुमेह (Diabetes) होतो आहे. भारतात तर जगातील सर्वाधिक मधुमेहाचा रुग्ण आढळत आहेत. ताणतणाव, जीवनशैलीतील चुकीचे बदल यामुळे या आजाराचा झपाट्याने विस्तार होतो आहे. यात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. यावर नियंत्रण न ठेवल्यास इतर अवयवांनादेखील इजा पोचवू शकते. त्यांची कार्यक्षमता कमी होते. मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो. जे लोक आता वयाच्या 40-50 वयोगटात आहेत त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही लोकांची या वयात फास्टिंग शुगर (Fasting Sugar) म्हणजे रिकाम्या पोटी साखर वाढलेली असते. या वयात रिकाम्या पोटी सकाळी साखरेची पातळी 90 ते 100 mg/dL दरम्यान असावी. साखरेचे प्रमाण यापेक्षा जास्त झाल्यास मधुमेहाचा धोका पोचू शकतो. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी रिकाम्या पोटी 100-125mg/dl च्या दरम्यान असली तर ते धोक्याचे लक्षण मानले जाते. रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी ते पाहूया. (In 40s keep control on fasting sugar to avoid risk of diabetes)

अधिक वाचा  : ट्विटरनंतर फेसबुकमधून 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले

रिकाम्या पोटी रक्तातील साखरेवर नियंत्रण कसे ठेवावे- 

जीवनशैलीत बदल
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर पाणी प्यावे. जर फास्टिंग शुगर 99 mg/dL किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे, जर जास्त असेल तर लगेच नियंत्रणासाठी उपाय करा. तज्ज्ञांच्या मते आहार आणि जीवनशैलीत बदल करून रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते.  यासाठी चालणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे फास्टिंग शुगर नियंत्रणात राहील. शिवाय वजन कमी केले पाहिजे कारण वाढलेल्या वजनामुळे मधुमेही रुग्णांना अडचणी येतात.

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

फायबरयुक्त पदार्थ खा
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवतात, असे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. आपले शरीर फायबर शोषून घेत नाही आणि त्याचे विघटन करत नाही. परिणामी त्याचा रक्तातील ग्लुकोजवर परिणाम होत नाही. संशोधनानुसार फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अधिक वाचा - India vs England Live Score, T20 World Cup Semi Final: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात

साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी काय करावे
रात्री वेळेवर जेवले पाहिजे, उशीरा जेवता कामा नये. रात्री झोपण्याच्या दोन-तीन तास आधी जेवण करा. शिवाय जेवल्याबरोबर झोपू नका, थोडेसे चाला. फास्टिंग शुगर वाढण्यासाठी तुमचा रात्रीचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. रात्री स्नॅक्स खाऊ नका, कार्बोहायड्रेट्स टाळा. यामुळे साखर नियंत्रणात राहील. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी