हिवाळ्यात जिमला जाता येत नाहीये, तर घरीच करा ‘हे’ ५ वर्कआऊट आणि राहा फिट

तब्येत पाणी
Updated Jan 09, 2020 | 18:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Indoor Workouts: कडाक्याच्या थंडीत जर आपण जिमला जावू शकत नसाल तर काळजी करू नका. आपण घरीच आपला फिटनेस मेंन्टेन करू शकता. जाणून घ्या कुठलं वर्कआऊट करावं...

Workouts
हिवाळ्यात जिमला जाता येत नाहीय, तर घरीच करा ‘हे’ ५ वर्कआऊट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • हिवाळ्यात जिमला जाणं होत नाही? तर जाणून घ्या घरीच करायचे खास वर्कआऊट
  • स्किपिंग, जंपिंग जॅक, स्क्वॉट, बर्पी आणि पुश-अप्स ठरतात महत्त्वाच्या
  • हे वर्कआऊट केल्यानंतर जबरदस्त होतो फायदा, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर

Workouts for winter: थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा कडाक्याची थंडी सुरू होते तेव्हा आपल्या दररोजच्या कामांवर थंडीचा परिणाम होत असतो. सकाळी सकाळी सगळीकडे धुकं असतं आणि सूर्यनारायणाचं दर्शन कधी होतं, कधी होत सुद्धा नाही. अशातच आपली सकाळी उठण्याची वेळ बदलते. थंडीत गरम गरम दुलईमध्ये झोप छान लागते आणि सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो.

या वातावरणात मॉर्निंग वॉक आणि जिम जाणाऱ्या लोकांना खूप आळस येतो आणि दररोज वर्कआऊट करायला ते जावू शकत नाही. थंडीत काही महिने जिमला जाणंही बंद होऊन जातं. बाहेर जाण्याचा कंटाळा येत असेल तर घरीच आपण काही विशेष वर्कआऊट केलं तर आपण थंडीतही फिट राहू शकता.

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये जिम नाही तर घरी करा हे वर्कआऊट

जंपिंग जॅक

हे एक असं वर्कआऊट आहे ज्यात खूल लवकर अधिक कॅलरीज बर्न होतात. जर आपण दररोज फास्ट १०० उड्या मारल्या तर आपल्या १०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. या वर्कआऊट दरम्यान आपण उडी मारत आपले हात डोक्यावर नेत हातांचा एकमेकांना स्पर्श करावा आणि त्याचवेळी पाय सुद्धा हातासारखे पसरवावेत. हे वर्कआऊट केल्यानं १ मिनीटाच्या आत शरीर गरम होतं आणि फॅट बर्न व्हायला लागतं.

स्किपिंग

स्किपिंग म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणं खूप सोपी असतं आणि ही लोकांची खूप आवडती एक्सरसाईज असते. हिवाळ्यात जर आपण जिमला जावू शकत नसाल आणि आपल्याला वजनवाढीची काळजी आहे. तर आपण घरीच दोरीवरच्या उड्या माराव्यात. दोरीवरील उड्या मारल्यानं खांदा, मांड्या आणि बॅक टोन्ड होतात आणि जर आपण २० मिनीटांपर्यंत दोरीवरील उड्या मारल्या तर आपल्या २०० कॅलरीज बर्न होऊ शकतात.

स्क्वॉट

स्क्वॉट आपण घरात खूप सहजपणे वजन घेऊन किंवा वजन न घेताच करू शकता. वजनसोबत ही एक्सरसाईज करण्यासाठी आपण विटेचा वापर करू शकतो. हे वर्कआऊट केल्यानंतर फक्त मसल्सच नाही तर बॅक आणि कोर मसल्स सुद्धा टोन होतात. स्क्वॉट करतांना व्हेरिएशनवर लक्ष अवश्य ठेवावं.

बर्पी

ही एक जबरदस्त फिटनेस एक्सरसाईज आहे जी आपण घरात खूप सहजपणे करू शकता. बर्पी केल्यानं कॅलरीज तर बर्न होतातच सोबतच आपली स्ट्रेंथ वाढते. बर्पीमध्ये स्क्वॉट, पुशअप्स आणि जंपिंग जॅक या तिन्हीची एक्सरसाईज एकत्र केलेली असते आणि शरीरावरील फॅट्स कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज खूप फायदेशीर ठरते.

पुश-अप्स

हा वर्कआऊटचा एक असा प्रकार आहे जो मुलं आणि मुली दोघंही करू शकतात. पुश-अप्स केल्यानं बॉडी शेपमध्ये राहते, मसल्स लवचिक होतात आणि जास्तीचे फॅट्स बर्न होतात. यामुळे बॉडी स्लिम दिसते आणि थंडीच्या दिवसांत आपला आत्मविश्वासही कायम राहतो. हे वर्कआऊट खूप प्रसिद्ध आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पुश-अप्स केल्यानंतर आपल्याला जिमला जाण्याचीही गरज नसते.

हे सर्व वर्कआऊट हिवाळ्यात आपण घरातच करू शकता. त्याचा फायदा आपल्याला होईल. त्यामुळे आपण फिट राहाल आणि आपला आत्मविश्वास कायम राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी