Food for brain : मुलांच्या डाएटमध्ये 'या' 5 गोष्टींचा समावेश करा, बुद्धी तल्लख होण्यासाठी उपयुक्त आहेत 'हे' पदार्थ

तब्येत पाणी
Updated Sep 23, 2022 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Food for children : असे अनेक पदार्थ आहेत (childrens diet) ज्यांचा मुलांच्या आरोग्यावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. ते खाल्ल्याने मेंदूची शक्ती (brain power) वाढते.या पदार्थांच्या सेवनामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते.

Include these 5 foods in childrens diet to increase brain power
मुलांच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा समावेश करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात.
  • मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी हे पदार्थ चांगले असतात.
  • या पदार्थांचा आहारात समावेश करा

Healthy Food For Kids: मुलांच्या वाढत्या वयासाठी पोषण महत्त्वाचं आहे. त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या आहेत. असे अनेक पदार्थ आहेत जे मुलांच्या मेंदूसाठी (Brain) खूप चांगले मानले जातात. त्या खाद्यपदार्थांचा आहारात (Diet) समावेश केल्याने मुलांच्या मेंदूवाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते. शरीरालाही यामुळे फायदा होतो. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करावा. 


मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अन्न (Foods That Increase Children's Brain Power)

आक्रोड

अक्रोड (Walnut) हे एक असे ड्रायफ्रूट आहे ज्याचा आकार मेंदूसारखा असतो आणि आक्रोड मेंदूला खऱ्या अर्थाने वाढवतो असेही सिद्ध झाले आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे हे मेंदूला चांगले बूस्टर आहे. हे मुलांना नाश्त्यात किंवा स्नॅक म्हणून दिले जाऊ शकते.

अधिक वाचा : तरुण मुलं विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात ?

बदाम 

सुपरफूड बदामांना ब्रेन फूड (Brain Food) असेही म्हणतात. प्रथिने, फॅटी अ‍ॅसिड जास्त प्रमाणात आढळतात. मुलांच्या मेंदूच्या पेशी वाढवण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी बदाम खाणे चांगले मानले जाते.


अंडे 

आरोग्यासाठी अंडी खाण्याचे अनेक फायदे आहे. मुलांच्या मनासाठी अंडी चांगली असतात. प्रथिनांसोबतच यात अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होते.मुलांनाही उकडलेले अंडे आणि ऑम्लेट खूप आवडते. 

अधिक वाचा :  'ही' अभिनेत्री का भडकली कपिल शर्मावर?


सफरचंद

आजार बरे करणारे सफरचंद (Apple) हे आरोग्यासाठी उत्तम फळांपैकी एक आहे. यामुळे  शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सफरचंद मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले असते. त्यामुळे मुलांच्या आहारात सफरचंदाचा समावेश अवश्य करावा. 

दही 

मुलांच्या आहारात दह्याचाही समावेश करावा. दही कॅल्शिअम आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. दह्यात चांगले फॅट आणि प्रोबायोटिक्स असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असतात. मुलांना सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी आहारात समावेश करावा. 

अधिक वाचा :  आमिरच्या लेकीचा झाला साखरपुडा, दोघांचा सुंदर व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी