Vitamin B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

तब्येत पाणी
Updated Apr 05, 2023 | 09:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

vitamin b12 Foods: व्हिटॅमिन बी 12 हे शरीरासाठी आवश्यक असणार पोषक तत्व आहे. पण हे जीवनसत्व असे आहे जे शरीर स्वतः बनवू शकत नाही, म्हणून आहाराद्वारे ते नियमितपणे घेणे आवश्यक आहे.

Include these 5 foods in diet to increase Vitamin B12 in your body
Vitamin B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी हे पदार्थ खा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • : व्हिटॅमिन बी 12 हे शरीरासाठी आवश्यक असणार पोषक तत्व आहे.
  • व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी का उपयोगी आहे?
  • व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं

Vitamin b12 Food: व्हिटॅमिन बी 12 हे शरीरासाठी आवश्यक असणार पोषक तत्व आहे. पण हे जीवनसत्व असे आहे जे शरीर स्वतः बनवू शकत नाही, म्हणून आहाराद्वारे ते नियमितपणे घेणे आवश्यक आहे. मांस, मासे, फळं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात मिळते.(Include these 5 foods in diet to increase Vitamin B12 in your body)

व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी का उपयोगी आहे? 

  • पचनाची प्रक्रिया सुधारते
  • रक्त निर्मितीमध्ये मदत होते
  • न्यूरोलॉजिकल फंक्शन्स चालवते
  • डीएनएच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं 

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची काही प्राथमिक लक्षण हात आणि पायांमध्ये आढळतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे, शरीरातील रक्त पेशींची निर्मिती कमी होते, ज्यामुळे हात-पायांवर सूज येते. 

अधिक वाचा: D Tan Pack: टॅनिंगमुळे त्वचा काळी झाली असेल तर घरी तयार करा डी टॅन फेस पॅक

  • थकवा आणि अशक्तपणा 
  • मानसिक आणि भावनिक स्थितींमध्ये बदल
  • भ्रम होणे, 
  • भूक न लागणे, 
  • मळमळ वाटणे 
  • चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे 
  • पाचनाची समस्या (अतिसार किंवा बद्धकोष्ठता) 
  • केस गळणे 
  • स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये स्नायूंची कमतरात 

अधिक वाचा: List Of Food Avoid During Pregnancy: गरोदरपणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, वाचा कोणते आहेत हे पदार्थ अन् काय होऊ शकतं नुकसान

या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते व्हिटॅमिन बी12 

1. मांस: मांस हे व्हिटॅमिन बी 12 चा महत्वाचा स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळते.

2. सी फूड: सी फूड जसे की मासे, फिश ऑईल, शिजवलेल्या रावस  फिशमध्ये रोजच्या गरजेच्या 200% पेक्षा जास्त व्हिटॅमिन बी 12 असते. 
3. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, चीज, दही, तूप इत्यादी देखील व्हिटॅमिन बी 12 चे समृद्ध स्रोत आहेत. एका कप दुधात दैनंदिन गरजापैकी 46% व्हिटॅमिन बी 12 असते. 

अधिक वाचा:  Bicornuate Uterus काही स्त्रियांचे गर्भाशय असते हृदयाच्या आकाराचे, गर्भधारणेत येऊ शकतात समस्या

4. अंडी: अंडी हे व्हिटॅमिन बी12 चा चांगला स्रोत आहे. तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात अंडी खाऊ शकता. दैनंदिन गरजापैकी 46% गरज दोन मोठ्या अंड्यांतून भागवली जाऊ शकते. 

5. यीस्ट फूड: ब्रेड, पास्ता, नूडल्स इत्यादी यीस्ट फूडमध्ये व्हिटॅमिन बी12 देखील मुबलक प्रमाणात आढळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी