Health Tips: तुमच्या आहारात करा या बियांचा समावेश...मग पाहा जादू, आजार राहतील दूर

Healthy Food : अनेकांना दररोज वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी पदार्थांची आवश्यकता असते. मात्र यात प्राधान्य फक्त चवीलाच असते. मग तो नाश्ता असो वा दुपारचे जेवण. मात्र डॉक्टर नेहमी सल्ला देतात की नाश्ता नेहमी निरोगी आणि चवदार तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा. त्यामुळे तुम्ही जर आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश आहारात आणि खास करून तुमच्या नाश्त्यामध्ये केला तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. अनेक आजार दूर राहतील.

Healthy Food
पोष्टिक आहार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आहाराचा (Food) आणि आपल्या आरोग्याचा (Health) थेट संबंध असतो
  • अन्न हे पौष्टिक आणि आरोग्यदायी (Healthy Food)असणे महत्त्वाचे असते.
  • नाश्ता नेहमी निरोगी आणि चवदार तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा.

Food Tips:नवी दिल्ली : स्वादिष्ट भोजन प्रत्येकालाच आवडते. आपल्या आहाराचा (Food) आणि आपल्या आरोग्याचा (Health) तर थेट संबंध असतो. त्यामुळे आहाराच्या बाबतीत फक्त चवीकडेच न पाहता अन्न हे पौष्टिक आणि आरोग्यदायी (Healthy Food)असणे महत्त्वाचे असते. काही लोक खाण्याबद्दल चोखंदळ असतात. त्यांना दररोज वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी पदार्थांची आवश्यकता असते. मग तो नाश्ता असो वा दुपारचे जेवण. मात्र डॉक्टर नेहमी सल्ला देतात की नाश्ता नेहमी निरोगी आणि चवदार तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा. दुर्दैवाने अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि जे मनात येईल ते खातात. अशा परिस्थितीत अलीकडच्या काळात कोलेस्ट्रॉलपासून(Cholesterol) ते रक्तातील साखरेपर्यंतच्या (Blood Sgar) समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, येथे काही बियांबद्दल जाणून घ्या ज्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. (Include these seeds in your diet and avoid problems of cholesterol and blood sugar)

अधिक वाचा : मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी सीएम शिंदेंच्या विविध घोषणा; मुख्यमंत्री मराठवाड्याचा बॅकलॉक काढणार भरुन

आजार टाळण्यासाठी या बियांचा आहारात समावेश करा-

1 सूर्यफुलाच्या बिया 
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले फायबर तुम्हाला एलडीएल कोलेस्टेरॉल (बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते) कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी-३ कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी करते. याशिवाय टाईप-2 मधुमेहावरही या बिया उपयुक्त असतात.

2 मेथीचे दाणे 
मेथीचे दाण्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरतात. रक्त आणि मूत्र ग्लुकोज कमी करते आणि उच्च सीरम कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. कच्च्या आणि पिकलेल्या मेथीच्या दाण्यांमध्ये हे गुणधर्म असतात.

अधिक वाचा : Amit Shah: 'ठंडे दिमाग से किया जाता है वह..', शेलारांनी सांगितला अमित शाहांचा भन्नाट किस्सा

3 चिया सीड्स
समोर आलेल्या माहितीनुसार चिया सीड्समध्ये फिनॉल असते. ते CHE ला प्रतिबंध करते. याशिवाय ते खराब कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर तसेच हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी करते.

4 फ्लेक्ससीड्स 
फ्लेक्ससीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅट्स, लिग्नॅन्स आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. या बियांमुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि अगदी कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, असे अनेक अहवालांतून दिसून आले आहे.

अधिक वाचा : सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

5 भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि ओमेगा-6 फॅट्स असतात. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. याशिवाय ते रक्तदाब कमी करू शकतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.

विविध फायद्यांमुळे या बियांचा तुमच्या आहारात समावेश करणे योग्य ठरते. आरोग्य ही आपल्या आयुष्यातील एक अमूल्य आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आरोग्य असल्यावरच आपण आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतो. त्यासाठी आपण आजारांपासून दूर राहायला हवे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी