पावसाळ्यात आहारात करा या गोष्टींचा समावेश, मिळेल तेजस्वी त्वचा आणि आजार राहतील दूर

तब्येत पाणी
Updated Jun 19, 2021 | 12:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

पावसाळ्याचा मोसम सुरू झाला आहे. या ऋतूत आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे हे अतिशय गरजेचे आहे. या गोष्टींमुळे फक्त आपल्या त्वचेवर तजेलाच येणार नाही तर आपले आऱोग्य सुधारण्यासही खूप मदत होईल.

Drinking water
पावसाळ्याच्या मौसमात आहारात करा या गोष्टींचा समावेश, मिळेल तेजस्वी त्वचा आणि आजार राहतील दूर  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image

थोडं पण कामाचं

  • भरपूर खा पावसाळ्यात मिळणारी फळे
  • पावसाळ्यात करा तुळशीच्या पानांचे सेवन
  • त्वचेच्या आरोग्यासाठी खा या बिया

नवी दिल्लीः देशात पावसाळा (Rainy season) सुरू झाला आहे. एकीकडे लोकांना गरमीपासून (heat) सुटका (rid) मिळवायची आहे तर दुसरीकडे हा ऋतू अनेक त्वचाविकारही (skin diseases) घेऊन येतो. सतत येणाऱ्या घामामुळे (sweat) अंगात सतत चिकचिकाट जाणवत राहतो. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही आपल्याला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा समावेश आहारात (diet) केल्यामुळे फक्त आपल्या त्वचेवर (skin) तजेलाच (glow) येणार नाही तर आपले आऱोग्य (health) सुधारण्यासही खूप मदत होईल.

भरपूर खा पावसाळ्यात मिळणारी फळे

मान्सूनचा ऋतू येताच चारीबाजूंना हिरवेगार वातावरण दिसते. तसेच अनेक पावसाळी फळांनी बाजारपेठा भरून जातात. जर आपल्याला या ऋतूत आपली त्वचा तजेलदार ठेवायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर या पावसाळ्यात मिळणाऱ्या फळांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करा. लिची, पेर, जांभळे ही फळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात आढळतात आणि या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेतली पाण्याची पातळी योग्य राखली जाते आणि कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

पावसाळ्यात करा तुळशीच्या पानांचे सेवन

पावसाळ्याची स्वतःची अशी एक मजा असते. मात्र या ऋतूत तुळशीची पाने आवर्जून खाण्याची सवय करून घ्या. तुळशीच्या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स आपल्याला अनेक रोग आणि आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात.

त्वचेच्या आरोग्यासाठी खा या बिया

पावसाळ्याच्या दिवसात आपल्या आहारात सूर्यफुलाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बियांचा समावेश अवश्य करा. या बियांमुळे आपली त्वचा तरुण आणि चमकदार बनते तसेच आपले आरोग्यही उत्तम राहते.

भरपूर पाणी प्यायला विसरू नका

अनेक लोक पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात पितात. जर आपणही असे करत असाल तर ही सवय लगेच बदला. पाण्यामुळे शरीरातील ओलावा कायम राहतो ज्यामुळे आपली त्वचा कोरडी दिसत नाही. जर आपण वेळोवेळी पाणी पीत राहिलात तर त्वचा स्वच्छ राहते आणि पाणी सामान्य आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी