कोरोनाशी लढायचे असेल तर या प्राणायामाचा करा आपल्या दिनचर्येत समावेश

तब्येत पाणी
Updated Apr 17, 2021 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

कपालभाती हा प्राणायाम आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो. कपालभाती क्रिया जर विपरीत करणी आसन मुद्रेत केला तर फुफ्फुसे आणि नासिकेची सफाई सहज होते. नेत्र ज्योती वातरोग आणि पचनातील रोगांतही लाभ मिळतो.

Immunity boosters
कोरोनाशी लढायचे असेल तर या प्राणायामाचा करा आपल्या दिनचर्येत समावेश  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • हे आहेत कपालभाती प्राणायामाचे फायदे
 • असा करा कपालभाती प्राणायाम
 • जाणून घ्या कधी कराल कपालभाती प्राणायाम

कोरोनाच्या (Corona) संसर्गापासून (infection) बचाव (safeguarding) करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या नियमांचे (security rules) पालन केले पाहिजे. हा आजार श्वासाच्या मार्गाने (respiratory path) आपला परिणाम करतो, त्यामुळे मजबूत रोगप्रतिकारशक्तीद्वारे (strong immunity) या रोगाशी लढा दिला जाऊ शकतो. कपालभाती प्राणायाम (Kapalbhati Prranayam) हा फुफ्फुसांची क्षमता (lung power) वाढवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो.

कोरोनावर मात करण्यासाठी जलनेती उपयुक्त

हे आहेत कपालभाती प्राणायामाचे फायदे

योगतज्ज्ञांनी  दिलेल्या माहितीनुसार कपालभाती क्रिया जर विपरीत करणी आसन मुद्रेत केला तर फुफ्फुसे आणि नासिकेची सफाई सहज होते. नेत्र ज्योती वातरोग आणि पचनातील रोगांतही लाभ मिळतो. हे आसन रक्ताचा प्रवाह मस्तिष्कापर्यंत नेते जेणेकरून रक्तशुद्धी, मस्तिष्क आणि फुफ्फुसांची ताकद वाढते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना आणि हृदयरोग असणाऱ्यांनाही मर्यादित प्रमाणात हा व्यायाम केल्यास उत्तम फायदा होतो. कंबरदुखी, स्लिप डिस्क, सर्वायकलच्या रोगांत मात्र हे आसन करू नये.

असा करा कपालभाती प्राणायाम

 • सर्वात आधी आरामात बसा.
 • आपली कंबर सरळ ठेवा आणि डोळे बंद करा.
 • आपल्या हाताचे तळवे गुडघ्यांवर ठेवा आणि तयार व्हा.
 • पूर्णपणे श्वास सोडा.
 • नाकातून श्वास घ्या आणि वेगाने सोडा. आता आपली बेंबी पाठीच्या मणक्याकडे खेचत पोटाच्या बळाने फुफ्फुसांमधून पूर्ण हवा बाहेर काढा.
 • जेव्हा आपण बेंबी आणि पोटाला आराम द्याल तेव्हा आपला श्वास आपल्या फुफ्फुसात जाईल.
 • एका आवर्तनासाठी असे 20 श्वास घ्या. आपले डोळे न उघडता आराम करा.
 • आता आपण कपालभाती प्राणायामाची 2 आणखी आवर्तने करू शकता.

जाणून घ्या कधी कराल कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम हा सकाळी न्याहारी न करता रिकाम्या पोटी करणे सर्वात चांगले असते. मात्र आपण हा प्राणायाम रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनीही करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी