Health Tips: सकाळी उठल्याबरोबरच जाणवतो अशक्तपणा? मग आहारात करा व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध पदार्थांचा समावेश

तब्येत पाणी
Updated May 27, 2022 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vitamin B12 Defincieny | अनेक लोकांना रात्री झोपताना एकदम ताजेतवाने वाटते मात्र सकाळी उठल्याबरोबरच कमजोरपणा, अशक्तपणा जाणवतो. लक्षणीय बाब म्हणजे अंथरुणातून उठण्यासाठीही ऑफिस किंवा इतर महत्त्वाच्या कामाचा संदर्भ घ्यावा लागतो.

Incorporating vitamin B-12 rich foods in the diet does not cause weakness
...तर आहारात करा व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध पदार्थांचा समावेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात.
  • प्राण्यांपासून मिळणारे मांस खर तर व्हिटॅमिन बी-१२ ने समृ्द्ध असते.
  • केळीला व्हिटॅमिन बी-१२ चा चांगला स्रोत देखील मानला जातो.

Vitamin B12 for Feeling Tired । मुंबई : अनेक लोकांना रात्री झोपताना एकदम ताजेतवाने वाटते मात्र सकाळी उठल्याबरोबरच कमजोरपणा, अशक्तपणा जाणवतो. लक्षणीय बाब म्हणजे अंथरुणातून उठण्यासाठीही ऑफिस किंवा इतर महत्त्वाच्या कामाचा संदर्भ घ्यावा लागतो. आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे खासकरून व्हिटॅमिन बी-१२, शरीराला आवश्यक प्रमाणात मिळत नाही म्हणून हे घडते. शरीर नीट काम करत नसेल तर हलकी चक्कर येणे, अन्न न खाणे, थकवा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. चला तर म जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध आहे जे सकाळी अशक्तपणा दूर करण्यात मदत करतात.

अधिक वाचा : विमानात गुटख्याचा डाग पाहताच IAS अधिकाऱ्यांनी उडवली खिल्ली 

व्हिटॅमिन बी-१२ ने समृद्ध असलेले पदार्थ (Vitamin B12 Rich Foods)

  1. अंडी - अंडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. यामध्ये प्रथिने आणि अमीनो ॲसिडसोबत व्हिटॅमिन बी-१२ देखील आढळते. तुम्ही याला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्यातील संपूर्ण भाग खाणे गरजेचे आहे अगदी त्यातील पिवळा भाग देखील बी-१२ ने समृद्ध आहे. 
  2. दही - दही व्हिटॅमिन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. हे खासकरून पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही दह्याचा समावेश करू शकता. 
  3. मांस - प्राण्यांपासून मिळणारे मांस खर तर व्हिटॅमिन बी-१२ ने समृ्द्ध असते. चिकन आणि टर्की इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. शरीरातील व्हिटॅमिन बी-१२ चे प्रमाण अनेक पटींनी वाढवण्यास प्रभावी आहेत. प्रत्येक इतर दिवशी त्यांचे सेवन केल्याने, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवणे थांबेल.
  4. केळी - केळीला व्हिटॅमिन बी-१२ चा चांगला स्रोत देखील मानला जातो. सकाळी एक केळी खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप वेळ भूकही लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी