मुंबई: जेव्हा वजन कमी(weight loss) करण्याबाबत बोलले जाते तेव्हा भारतीय जेवणाला(indian food) तितकीशी पसंती दिली जात नाही. भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स(carbohydrates) आणि फॅट्स(fats) असतात. भारतीय जेवणातील दोन मुख्य पदार्थ भात आणि चपातीमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात. तसेच करीमध्ये फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे दोनही पदार्थ शरीरातील कॅलरीज वाढवतात. यासाठी लोक आपल्या डाएटमध्ये याचा समावेश करत नाहीत. व
वजन कमी करण्यासाठी लोक पाश्चिमात्य पदार्थ जसे ओट्स, योगर्ट, सलादला पहिली पसंती दर्शवतात. मात्र खरी समस्या भारतीय पदार्थांमध्ये नाही तर जेवणाच्या तयारीमध्ये आहे. वास्तवात भारतीय जेवण हे पोषकतत्वांनी भरलेले असते. यामुळे वजन घटवण्यास फायदा होतोच त्यासोबतच शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मात्र त्यासाठी अट अशी की त्याला योग्य पद्धतीने तयार केले गेले पाहिजे.
हळद, काळी मिरी, लवंग, जिरे, मोहरी हे मसाल्याचे पदार्थ केवळ पदार्थाची चव वाढवत नाहीत तर यात मोठ्या प्रमाणावर पोषणतत्वे असतात. आरोग्याला होणाऱ्या फायद्यांमुळे या मसाल्यांचा वापर पदार्थामध्ये केला जातो. यात सूजविरोधी, बॅक्टेरियाविरोधी आणि अँटी ऑक्सिडंट हे गुण असतात ज्यामुळे जुने आजार दूर होतात. मसाले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकून वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने करतात.
करीला हेल्दी बनवण्यासाठी योग्य प्रमाणात फॅटचा वापर होणे आवश्यक असते. पारंपारिक भारतीय जेवण बनवण्यासाठी मोहरीचे तेल, नारळाचे तेल अथवा तूप वापरले जाते. जर तुम्ही हे तेल अथवा तूप योग्य प्रमाणात वापरले तर हे जेवण हेल्दी बनते. भांड्यात तेलाच्या प्रमाणावर लक्ष न दिल्यास तुमचे जेवण हेल्दी होणार नाही. यासाठी जेवण शिजवताना कमीत कमी तेलाचा वापर करा.
चपाती तयार करण्यासाठी प्रामुख्याने गव्हाचा वापर केला जातो. चपाती कार्बोहायड्रेट्सचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र तुम्ही चपातील अधिक हेल्दी बनवण्यासाठी त्याच्या जागी ज्वारी, बाजरी, नाचणीचा समावेश करू शकता.
भारतीय पदार्थ हेल्दी असतात कारण ते घरी ताजे बनवलेले असतात. चपातीपासून ते करी पर्यंत सर्व फूड हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचा वापर करून बनवलेले असते. त्यामुळे प्रोसेस्ड फूड वापरण्याऐवजी घरी बनवलेले ताजे पदार्थ खा. प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.