कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त २ वेळा करा 'हे' काम

Injectable Drug Inclisiran Found It Cut LDL Cholesterol, Know How To Control It : फक्त दोन वेळा एक छोटे काम करून आपण स्वतःचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवू शकता. 

Injectable Drug Inclisiran Found It Cut LDL Cholesterol, Know How To Control It
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त २ वेळा करा 'हे' काम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त २ वेळा करा 'हे' काम
  • कोलेस्टेरॉलवर रामबाण उपाय
  • दोन वेळा एक छोटे काम करून आपण स्वतःचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवू शकता

Injectable Drug Inclisiran Found It Cut LDL Cholesterol, Know How To Control It : जंकफूड, फास्टफूड, तेलकट पदार्थ, साखर, मैदा, मांसाहाराचा अतिरेक, दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे यामुळे शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. हे संकट टाळण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखणे आणि अपायकारक कोलेस्टेरॉल वाढू नये अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी आहाराची पथ्ये पाळणे आणि शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. पण अनेकांना हे जमत नाही. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या पण सुटत नाही. आता यावर एक रामबाण उपाय उपलब्ध आहे. फक्त दोन वेळा एक छोटे काम करून आपण स्वतःचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवू शकता. 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, मधुमेह अर्थात डायबिटिस आणि हृदयविकाराचा (हार्ट प्रॉब्लेम) धोका जास्त असतो. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार संशोधकांनी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यासाठी इनक्लिसिरन नावाचे इंजेक्शन विकसित केले आहे. या इंजेक्शनचे वर्षभरात फक्त दोन डोस घेऊन कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. आतापर्यंत इंजेक्शन संदर्भात जेवढ्या चाचण्या झाल्या आहेत त्यांचे अहवाल उत्साह वाढविणारे आहेत. पण या इंजेक्शनचा वापर इच्छुक व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. डॉक्टरांनी परवानगी दिली नसताना इंजेक्शन टोचून घेणे धोक्याचे ठरू शकते. कदाचित जीवघेणे पण ठरू शकते.

संशोधकांचे म्हणणे आहे की, इनक्लिसिरन इंजेक्शन घेतल्यास शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने आहाराची पथ्ये पाळणे आणि व्यायाम करणे अश स्वरुपाचे उपाय उपलब्ध आहेत. हे उपाय करणे शक्य आहे. मात्र झटपट कोलेस्टेरॉल कमी करायचे असल्यास इनक्लिसिरन इंजेक्शन हा एक उपाय आहे. पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय या उपायाचा अवलंब करू नये असे संशोधकांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी