International Beer Day 2022 : बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे, वाचून व्हाल चकित

बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. बिअरचं प्रमाण ही आहे या दोन्हीतली सीमारेषा. आजच्या आंतरराष्ट्रीय बिअर डेच्या निमित्ताने जाणून घेऊया या दिवसाविषयी आणि बिअरच्या फायद्या-तोट्यांविषयी.

International Beer Day 2022
बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • आज आहे आंतरराष्ट्रीय बिअर डे
  • ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा होतो दिवस
  • बिअरचे फायदे आणि तोटे

International Beer Day 2022 : दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला शुक्रवार (First Friday in August) हा आंतरराष्ट्रीय बिअर डे (International Beer Day) म्हणून साजरा केला जातो. सर्व मित्र आणि आप्तेष्टांनी एकत्र येत बिअरचा आस्वाद घ्यावा, या त्यामागील मूळ हेतू. जगभरातील अनेक देशात वर्षानुवर्षे बिअर प्यायली जाते. आनंदाच्या वेळी, दुःखाच्या वेळी किंवा केवळ एकत्र येऊन गप्पांचा फड रंगविण्यासाठी बिअर पिण्याची जुनी पद्धत आहे. बिअर प्यावी की नाही, याबाबत अनेकांमध्ये मतभेद असतात. मात्र आपल्याकडे बिअर मोठ्या प्रमाणात खपते आणि अनेकजण त्याचाा आस्वाद घेत असल्याचं दिसतं. बिअरच्या दुष्परिणामांविषयी (Side Effects) नेहमीच बोललं जातं. मात्र त्याचे काही फायदेही (Benefits) शरीराला होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

बिअर डे च्या निमित्ताने

बिअर डे च्या निमित्ताने दारुचे फायदे आणि तोटे या दोन्ही मुद्द्यांची चर्चा होत असतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, तर नुकसानच होतं, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. बिअरच्या बाबतीतही हेच आहे. बिअर हा प्रकार शरीरासाठी हानीकारक ठरतो, जर त्याच्या प्रमाणावर ताबा राहिला नाही, तर! मात्र जर बिअर प्रमाणात घेतली, तर त्या असणाऱ्या काही घटकांमुळे शरीराला फायदाही होत असल्याचं दिसून येतं. आंतराष्ट्रीय बिअर डेच्या निमित्ताने जाणून घेऊया बिअरपासून होणारे फायदे आणि तोटे.

अधिक वाचा - Health Tips: हृतिक रोशनच्या आईचा भन्नाट फिटनेस, ६७व्या वर्षी मारतायेत पुशअप

हे होतात फायदे

हेल्थलाईनने दिलेल्या रिपोर्टनुसार 355 मिलीच्या बिअरच्या कॅनमध्ये 153 कॅलरी असतात. त्यात काही मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात. बिअर ही धान्य आणि यीस्ट यापासून तयार झालेली असते. बिअर प्यायल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होत असल्याचंही काही संशोधनांमधून दिसून आलं आहे. बिअरमध्ये अल्कोहोल असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवायला मदत होऊ शकते. डायबेटिस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यामुळेच प्रमाणात घेतलेेली बिअर ही फायदेशीर मानली जाते. कमी प्रमाणात बिअरचं सेवन हे महिला आणि पुरुषांची हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं सांगण्यात येतं. प्रमाणात घेतलेली बिअर ही डिमेन्शियाचा धोका कमी करते, तर प्रमाणाबाहेर घेतलेल्या बिअरमध्ये हाच धोका कित्येक पटींनी वाढतो. 

अधिक वाचा - Vitamin B12 Deficiency : शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे काय होते? जाणून घ्या कोणत्या आजारांचा वाढतो धोका

होऊ शकतं हे नुकसान

बिअरच्या अतिसेवनानं काही गंभीर परिणाम शरीरावर होतात. जाणून घेऊया त्यातील काही महत्त्वाचे दुष्परिणाम

  • बिअरमध्ये जास्त अल्कोहोल असतं. त्यामुळे माणसाचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते.
  • वारंवार बिअर प्यायल्यामुळे त्याचं व्यसन जडण्याची शक्यता असते. हे व्यसन आरोग्यासाठी चांगलं नसतं.
  • जास्त बिअर प्यायल्याने लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते.
  • बिअरच्या एका कॅनमध्ये 153 कॅलरी असतात. तुम्ही रोज रोज बिअर प्यायलीत, तर फटाफट तुमचं वजन वाढू शकतं.
  • अल्कोहोलच्या सेवनामुळे घसा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय इतरही अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. 

डिस्क्लेमर - बिअरबाबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेली आणि लोकांमध्ये चर्चेत असलेली ही सामान्य माहिती आहे. तुम्हाला आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी