Yoga Asanas For Weight Loss | मुंबई : दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात योगाशी संबंधित अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताशिवाय विदेशात देखील लोक या दिवशी योग करून हा दिवस साजरा करतात. लक्षणीय बाब म्हणजे योग भारताकडून संपूर्ण जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. एका आरोग्यदायी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहेत. योगाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल घडवून आणू शकता. शारीरिक आरोग्याशिवाय मानसिक आरोग्यासाठी देखील योग प्रभावी आहेत. (International Yoga Day 2022 These yoga can help you to lose weight).
दरम्यान, आजच्या धावपळीच्या जीवनात वाढते वजन, लठ्ठपणा ही खूप सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक नाना प्रकारचे उपाय अवलंबत असतात. तरी देखील यापासून सुटका होत नसल्याची तक्रार होत असते. त्यामुळे आज आपण अशा काही योगासनांबद्दल भाष्य करणार आहोत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकता.
अधिक वाचा : एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार ‘आऊट ऑफ रिच
योग केल्याने वजन कमी होते की नाही यावर लोकांनी अनेक प्रकारची मतं व्यक्त केली आहेत. योगासोबत तुम्ही हेल्दी डाएट घेता तेव्हा वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी होण्यासोबतच तुमचे डोके आणि शरीर देखील निरोगी राहते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर योगांसोबत हेल्दी डाएट घेणे आवश्यक आहे.