वाढत्या बर्ड फ्लूदरम्यान अंडी अथवा चिकन खाणे हानिकारक आहे का?

तब्येत पाणी
Updated Jan 11, 2021 | 18:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

२०२१ या नव्या वर्षातही समस्या काही थांबत नाही आहेत. कोरोना व्हायरसनंतर आता लोकांवर बर्ड फ्लूचे संकट घोंघावत आहे. या बर्ड फ्लूदरम्यान अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का?

chicken
वाढत्या बर्ड फ्लूदरम्यान अंडी अथवा चिकन खाणे हानिकारक आहे? 

थोडं पण कामाचं

  • २०२१मध्ये भारताला बर्ड फ्लूचा धोका
  • दिल्ली आणि महाराष्ट्रासह ९ राज्यांमध्ये बर्ड फ्लूची एंट्री
  • बर्ड फ्लूदरम्यान अंडी अथवा चिकन खाणे सुरक्षित आहे का?

मुंबई: २०२० या वर्षात जगभरातील देशांसह भारतातही विविध नकारात्मक घटना घडल्या. कोरोना व्हायरसपासून(corona virus) ते अर्थव्यवस्था अपंग होण्यापर्यंत मानवजातीने अनेक आव्हानांचा सामना केला. आता नव्या वर्षात म्हणजेच २०२१च्या सुरूवातीलाच भारतावर बर्ड फ्लूचा(bird flu) धोका आहे. दिल्ली(delhi), पंजाब(punjab) आणि राजस्थानसह(rajasthan) भारतातील ९ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे इन्फेक्शन पोहोचले आहे. बर्ड फ्लूचे इन्फेक्शन रोखण्यासाठी पक्ष्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यातच मांसाहारी लोक जे अंडी तसेच चिकनचे सेवन करतात ते मात्र त्रस्त आहेत. त्यांना हे समजत नाही आहे की बर्ड फ्लूदरम्यान अंडी अथवा चिकनचे सेवन केले पाहिजे की नाही. 

तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का की बर्ड फ्लूदरम्यान चिकन अथवा अंडी खावीत की नाही तर आम्ही या प्रश्नाचे उत्तर देत आहोत.

माणसांसाठी किती धोकादायक  आहे बर्ड फ्लू

एव्हियन फ्लू एक धोकादायक इन्फेक्शन मानले जाते ते पक्षांच्या मलातून अथवा इतर दुसऱ्या माध्यमातून माणसांमध्ये येऊ शकते. दरम्यान, हे इन्फेक्शन एका माणसाकडून दुसऱ्याकडे पसरत नाही. जगात फार कमी केसेस घडल्या आहेत. जर माणूस या इन्फेक्शनने पीडित झाल्यास तर त्या व्यक्तीमध्ये खोकला, सर्दी, छातीत दुखणे अथवा घसा दुखणे ही लक्षणे दिसू लागतात. या समस्या वाढल्यास हे खूप हानिकारक ठरू शकते. लोकांमध्ये हे इन्फेक्शन चिमण्यांची अंडी आणि पक्ष्यांचे मटण खाल्ल्याने पसरू शकतात. 

अंडी अथवा पक्ष्यांचे मटण खाल्ल्याने माणसांना इन्फेक्शन होऊ शकते का?

विज्ञानानुसार अंडी आणि पक्ष्यांचे मटण कोणत्याही निरोगी व्यक्तीच्या शरीरात जाण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. जर चिमण्यांपासून मिळवलेले खाद्यपदार्थ नीट धुवून आणि चांगले शिजवून खाल्ल्यास ते कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहेकी पक्ष्यांचे मटण अथवा पोल्ट्रीमधून मिळवलेले मांस चांगले शिजवल्यास त्यातील सगळे जंतू, व्हायरस मरून जातात. जे लोक मांसाहार करतात त्यांनी ही पद्धत जरूर लक्षात ठेवली पाहिजे. 

चिकन अथवा अंडी फक्त धुतली तर चालतील का?

जर तुम्ही विचार करत असाल की बाहेरून आणलेली अंडी आणि चिकन केवळ धुतल्याने ते खाण्यालायक झाले असतील तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. हे पदार्थ धुतल्यानंतर पेपर टॉवेलने साफ करा. साफ केल्यानंतर ते योग्य तापमानावर शिजवल्यास त्यातील कीटाणू मरून जातात. ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हा सल्ला देतात की शिळी अंडी खरेदी करू नये. 

जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खात असाल तर ऑर्डर करताना क्वॉलिटी जरूर चेक करा. त्यापेक्षा घरातच मांस अथवा अंडी शिजवून खाल्ल्यास उत्तम . अंडी शिजवताना लक्ष द्या की अंड्याचे बलक चांगले शिजले पाहिजे. जर अंडी फोडताना ते वाहून जात असेल तर अशी अंडी खाऊ नका. हे पदार्थ धुण्यासोबतच यांच्या स्वच्छतेकडेही जरूर लक्ष द्या. जेवण बनवण्याआधी आणि बनवल्यानंतर आपले हात २० ते सेकंद चांगले धुवा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी