Covid impact on brain: आता मेंदूवर परिणाम करतोय कोरोना? जाणून घ्या याविषयीचं संशोधन

तब्येत पाणी
Updated Sep 15, 2020 | 15:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Covid impact on brain: कोरोनाच्या विषाणूनचा परिणाम मेंदूवरही होतो. जाणून घ्या याबाबत काय सांगत आहे ताजे संशोधन.

Covid-19 virus
Covid impact on brain: आता मेंदूवर परिणाम करत आहे कोरोनाचा विषाणू? जाणून घ्या काय सांगते संशोधन  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • मेंदूवर हल्ला करतो कोरोना, संशोधन अद्याप प्राथमिक पातळीवर
  • संशोधनकर्त्यांनी तीन प्रकारांनी हे कोडे सोडवण्यासाठी केले संशोधन
  • याबाबतचे संशोधन सुरू आहे आणि वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत

नवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona virus) आपल्या प्रतिकार शक्तीवर आणि आरोग्यावर हल्ला (along with attacking our immunity and health) करण्यासोबतच आपल्या मेंदूवरही हल्ला करू (can also attack human brain) शकतो. कोरोनाच्या रोग्यांमध्ये डोकेदुखी, भ्रम होणे, अचानक बेशुद्ध होणे अशी लक्षणे मेंदूवर थेट हल्ल्याची सूचना (symptoms like headache, sudden unconsciousness, hallucination are signs of this direct attack on brain) देतात. याबाबतचे संशोधन अद्याप प्राथमिक पातळीवर (research still on primitive level) आहे, पण याआधीही अशाप्रकारचे अनेक दावे करण्यात आले (similar claims have been made earlier) होते.

डॉक्टर आत्तापर्यंत करत होते असा विचार

अशाप्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये दिसल्यावर डॉक्टर आत्तापर्यंत काही वेगळाच विचार करत होते. त्यांना वाटायचे की सर्व रुग्णांमधील जवळपास अर्ध्या रुग्णांमध्ये दिसणाऱ्या न्यूरॉलॉजिकल प्रभावामुळे नाही, तर असामान्य रोगप्रतिकारकशक्तीचा हा परिणाम असू शकतो ज्याला सायटोकिन स्टॉर्म म्हणतात आणि जो मस्तिष्काला सूज आल्याने होतो.

मृत कोव्हिड-19 रुग्णांच्या मेंदूवर झाले संशोधन

वास्तविक कोरोना आता लोकांच्या मेंदूवर हल्ला करत आहे का याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी डॉक्टरांनी मृत कोरोना रुग्णांच्या मेंदूच्या पेशींची तपासणी केली. याशिवाय हे कोडे सोडवण्यासाठी संशोधकांनी उंदरांना याचा संसर्ग करून प्रयोगशाळेत एक छोटा मेंदू विकसित करून त्यालाही संसर्ग करून संशोधन सुरू केले आहे.

संशोधकांना आढळले हे परिणाम

या तिन्ही प्रक्रियांमध्ये संशोधकांना असे आढळून आले की प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या मेंदूच्या ऑर्गेनॉड्सध्ये SARS-CoV-2 विषाणू न्यूरॉन्स संक्रमित करण्यास सक्षम आहे आणि त्यानंतर न्यूरॉन्स सेलची यंत्रणा स्वतःच्या प्रतिमा बनवण्यापासूनही थांबवते.

संक्रमित पेशी आपल्या आजूबाजूच्या पेशींपर्यंत पोहोचणारा प्राणवायू थांबवून त्यांना मारण्यातही सफल झाल्या. पण हे संशोधन अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यामुळे याबाबत आत्ताच काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी