Hair Loss during Covid-19: कोरोना काळात केस गळताहेत? जाणून घ्या कारणं आणि त्यावरील उपाय

Hair fall during Corona Time: कोरोनाच्या या संकटकाळात केस गळण्याच्या आणि तुटण्याच्या खूप तक्रारी येत आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितले कारणं...

Hair Fall during Cornona Time
कोरोना काळात केस गळताहेत? जाणून घ्या कारणं आणि त्यावरील उपाय  |  फोटो सौजन्य: Shutterstock

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकटकाळात केसगळतीचं प्रमाण वाढलं.
  • कोरोनाचा केसगळतीशी संबंध नाही, पण यामुळे येत असलेल्या तणावामुळे केसगळती होत असल्याचं रिसर्चमधून निष्पन्न
  • जाणून घ्या केसगळती होत असल्यास काय आहेत खास उपाय

सध्या आपल्याही खांद्यावर, टॉवेलवर आणि उशीवर केसच केस दिसत आहेत का? तर याचं कारण टेलोजेन इफ्लूवियम पण असू शकतं. एका रिसर्चनुसार कोविड-१९च्या तणावामुळे अधिकाधिक लोक टेलोजेन इफ्लूवियममुळे ग्रस्त झालेले आहेत. कोरोना व्हायरस एक असं संक्रमण आहे, जे आपल्या फुफ्फुसांशिवाय हृदय, मेंदू, किडनी आणि पाचनक्रियेवर पण परिणाम करतोय, मात्र नुकतंच हे समोर आलंय की, रुग्णांच्या केसांवर सुद्धा कोरोनाचा परिणाम बघायला मिळतोय.

काय आहे टेलोजेन इफ्लूवियम म्हणजे (Telogen Effuvium)

यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते, जे की तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून येते. तणावामुळे अनेकांचे केस पुंजक्यांच्या स्वरूपात गळतात, सध्या ही समस्या अधिक वाढली आहे. तणावपूर्ण स्थितीनंतर असं होणं सामान्य आहे. मात्र अशा परिस्थितीत लोकांचे केस परत उगवतात.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, केसगळती सरळ व्हायरसशी निगडित नाहीये, मात्र ताप आणि इतर लक्षणांचा परिणाम म्हणून शरीराला शॉक लागल्यानं हे होऊ शकतं.

All about hair loss, its causes and solutions - Times of India

केस गळत असतील तर काय करावं?

यावेळी तज्ज्ञांना हे माहित नाही की, कोरोना व्हायरसमधून बरे झालेल्या लोकांना केसगळतीचा काय अनुभव येतोय. मात्र जर आपण पण या परिस्थितीतून जात असाल, तर लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्यामध्ये बदल घडवून त्रास दूर केला जावू शकतो.

जेवणात या गोष्टींचा कसा समावेश

  • पालक: पालक आणि इतर पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, फोलेट, आयरन, बीटा कॅरोटीन असतं, जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं.
  • ड्राय फ्रूट्स: सध्या जगातील सर्वात आरोग्यशाली खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे सुकामेवा आहे. जे पौष्टिक आणि केसांच्या विकासासाठी पण एक फायदेशीर पर्याय आहे.
  • How to tell if your dry fruits are Adulterated | The Times of India
  • दही: दह्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात, जे आपल्या केसांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी५ (पॅंटोथेनिक ऍसिड) पण असतं, जे केसांच्या विकासासाठी आणि आपल्या डोक्यात रक्तप्रवाह करण्यात मदत करतं.
  • संकटं येतात तर त्याच्यावर उपायही करता येऊ शकतात. कदाचित यात खूप वेळ लागेल. पण तणावाखाली येऊन आपण आपलं आरोग्य खराब करू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी