रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2023 | 16:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hot Water Benefits:आपल्या शरीरात 60% पाणी असते हे तर आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या माहितच आहे. हायड्रेशन, शरीराला उर्जा देण्यासाठी आणि सर्व महत्वाच्या अवयवांच्या योग्य कार्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे.

Is it good to drink warm water on an empty stomach? Know from experts
रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे चांगले आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • तज्ज्ञांकडून जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे
 • गरम पाणी वेदनाशामक म्हणून काम करते
 • शरीराच्या दुखण्यापासून आराम देते.

Warm Water Benefits:आपल्या शरीरात 60% पाणी असते हे तर आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या माहितच आहे. हायड्रेशन, शरीराला उर्जा देण्यासाठी आणि सर्व महत्वाच्या अवयवांच्या योग्य कार्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे. आपली जीवनशैली आणि शरीराच्या गरजेनुसार दररोज 11 ते 16 ग्लास पाणी पिण्याबाबत डॉक्टर सल्ला देतात.(Is it good to drink warm water on an empty stomach? Know from experts)

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर

आपल्यापैकी बहुतेक लोक थंड पाणी पितात. पण आयुर्वेदामध्ये हे गरम किंवा कोमट पाणी पिण्याबाबत सांगण्यात आलं आहे. प्राचीन औषधौपचार पद्धतीमध्ये विशेषतः सकाळी कोमट पाणी पिण्याची शिफारस केली आहे. कारण कोमट पाणी शरीराला आतून बरे करते, एका अभ्यासानुसार गरम पाणी आपले आतडे मजबूत करतात आणि चयापचय क्रिया सुधारते, पचनशक्ती वाढवते. गरम पाण्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये अनेक चमत्कारिक बदल होऊ शकतात.

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

बहुतेक महिला त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफी किंवा चहाने करतात. पण या सवयीमुळे गॅस, पोटदुखी, पुरळ, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे, ज्या महिला आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात, त्या काही आरोग्यदायी पेये किंवा गरम पाणी पितात.


गरम पाणी पिण्याचे फायदे

 • शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी एक ग्लास गरम पाण्याइतके औषधी दुसरे काहीही नाही. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर गरम पाण्याने पचन यंत्रणा सुधारण्यासही मदत होते.

अधिक वाचा: Bottle Germs:टॉयलेट सीटपेक्षाही घाण असू शकते तुमच्या पाण्याची बाटली, निष्काळजीपणामुळे होऊ शकतो गंभीर आजार

 • दमा, खोकला, सर्दीपासून आराम मिळण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
 • कोमट पाणी मायग्रेन, सायनससारखी ऍलर्जी आणि इतर प्रकारच्या डोकेदुखीपासून त्वरित आराम देते. गरम पाण्यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, यामुळे त्वचा चमकदार होते. त्वचेच्या पेशींची अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होण्यास मदत होते.
 • आहारतज्ञ परिधी दुदानी कालरा यांच्या मते, सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यास शरीराला व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची आवश्यक मात्रा मिळते. तुमची रोगप्रतिकारक वाढते. चेहऱ्यावरील पुरळ, सुरकुत्या आणि काळे डाग दूर होतात.

अधिक वाचा: Original Paneer: भेसळयुक्त पनीर कसे ओळखायचे? जाणून घ्या सोप्या पद्धती

 • गरम पाणी वेदनाशामक म्हणून काम करते आणि शरीराच्या दुखण्यापासून आराम देते. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना आणि डोकेदुखी,पोटदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
 • गरम पाणी पिणे हाय कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांसाठी चांगले आहे. यामुळे आपल्या शरीरातील फॅट बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
 • गरम पाणी शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. हे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका देखील कमी करू शकते.


अधिक वाचा: Long Hair Tips:टक्कल पडण्याची वाट बघू नका, केस लवकर वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय

 • कोमट पाणी केस गळणे आणि पांढरे होण्यास प्रतिबंध करते. गरम पाणी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीही चांगले असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी