How much salt is in salad: सलाड जवळपास सर्वचजण खात असतात. सलाडमध्ये लिंबूसह मीठ टाकून खाणारे लोक त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात एक लहानशी चूक करतात. सलाडमध्ये मीठ टाकल्याने त्याची चव नक्कीच वाढते मात्र, हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाहीये. याचं कारण विचाराल तर ते म्हणजे मीठाचा प्रकार आणि सोडियमचे प्रमाण याच्याशी संबंधित आहे. (is it good to eat salad with salt read in marathi)
सलाडच्यावर सफेद मीठ टाकून खाणे हे शरीरातील सोडियमची पातळी वाढवू शकते. त्यामुळे तसे करावे की नाही? याबाबत जाणून घ्या...
सलाडवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरात सोडियमची पातळी वाढते आणि यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. सलाडच्यावर मीठ टाकून खाणे म्हणजे एकप्रकारे मीठाचे अतिसेवन करणे आहे जे शरीरातील मीठाचे प्रमाण वाढवते. तसेच ब्लड प्रेशर वाढवण्याची समस्या उद्भवते. इतकेच नाही तर शरीरातील कॅल्शियमची कमी होऊ शकते आणि हाडे कमकुवत होऊ शकतात.
हे पण वाचा : Rahul Gandhi: राहुच्या चक्रात अडकले राहुल गांधी, जाणून घ्या काय होईल पुढे...
सलाडमध्ये मीठ टाकून खाल्ल्याने डायजेस्टिव इंजाइम्सला नुकसान होते आणि नंतर पचनसंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो. याच्या व्यतिरिक्त हाडांमधील कॅल्शियम कमी करते तसेच सांधेदुखी होऊ शकते. तसेच झोप न येणे आणि रक्तदाब वाढून अस्वस्थता वाढण्याची समस्या उद्भवते.
हे पण वाचा : लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय
अशा प्रकारचे आरोग्याला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सलाडमध्ये काळे मीठ किंवा सैंधव मीठ टाकावे. या दोन्ही मीठात सोडियम कमी असले तरी चव मात्र पूर्णपणे देतात. या मीठांमुळे पचन, अॅसिडीटी आणि गॅसच्या संदर्भातील समस्या दूर होतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)