रिकाम्या पोटी व्यायाम करणे किंवा खेळणे चांगले आहे का? जाणून घ्या काय सांगते संशोधन

तब्येत पाणी
Updated Jul 19, 2021 | 10:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

आधी पोटोबा, मग विठोबा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. हेच त्या लोकांनाही लागू पडते का जे व्यायाम करतात किंवा नियमितपणे खेळतात? सामान्यतः वर्कआऊट करण्याच्या आधी काही न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Belly fat
रिकाम्या पोटी व्यायाम करणे किंवा खेळणे चांगले आहे का? जाणून घ्या काय सांगते संशोधन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या काय सांगते याबाबतचे संशोधन
  • साठवणीतली ताकदही वापरत असते मानवी शरीर
  • हे आहेत रिकाम्या पोटी व्यायामाचे दुष्परिणाम

मुंबई : आधी पोटोबा, मग विठोबा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. हेच त्या लोकांनाही लागू पडते का जे व्यायाम (Exercise) करतात किंवा नियमितपणे खेळतात (sports)? सामान्यतः वर्कआऊट (workout) करण्याच्या आधी काही न खाण्याचा सल्ला (advice) दिला जातो. बहुतांशी सकाळी (morning) केलेला व्यायाम हा तासाभरापेक्षा जास्त चालत नाही ज्यासाठी आपल्या शरीराला (body) पुरेशी ताकद (enough energy) असते. ही ताकद ग्लायकोजेनद्वारे (glycogen) मिळते जो साखरेचा (sugar) अतिरिक्त साठा (excess storage) असतो जो स्नायू (muscles) आणि यकृतात (liver) साठवलेला असतो. व्यायाम करताना यातूनच आपले शरीर गरजेची असलेली ताकद मिळवते.

जाणून घ्या काय सांगते याबाबतचे संशोधन

नॉर्थम्ब्रिया विद्यापीठाने ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये 24 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनात संशोधकांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला की रात्रभर पोटात काहीही नसताना सकाळी केलेल्या व्यायामामुळे भूक वाढून दिवसभरात जास्त अन्न घेतले जाते का. यात तीन मुद्द्यांचा अभ्यास त्यांनी केला-

- सहभागी लोक रिकाम्या पोटी व्यवस्थित व्यायाम करू शकतात का?

- यामुळे नंतर दिवसभरात जास्त अन्न घेतले जाते का?

- या प्रक्रियेत एकूण किती फॅट कमी होते?

या संशोधनासाठी 12 सक्रीय पुरुष निवडण्यात आले. त्यांना सकाळी 10 वाजता एक तास ट्रेडमिलवर व्यायाम करण्यास सांगितले गेले. यातल्या अर्ध्या पुरुषांना व्यायामापूर्वी नाश्ता दिला गेला तर अर्धे उपाशी होते. व्यायामानंतर या सर्वांना रिकव्हरी ड्रिंक म्हणून चॉकलेट मिल्कशेक देण्यात आले. दुपारच्या जेवणाला पास्ता देण्यात आला आणि पोटभर खाण्याची मुभा दिली गेली. यावेळी त्यांनी घेतलेली शक्तियुक्त पदार्थ आणि फॅटची मोजणी केली गेली. सकाळच्या वेळी वापरण्यात आलेले फॅट आणि शक्तीही मोजली गेली.  

साठवणीतली ताकदही वापरत असते मानवी शरीर

या संशोधनाच्या निरीक्षणातून असे दिसून आले की सर्व सहभागी पुरुष त्यांचे सकाळचे रोजचे व्यायाम पूर्ण करू शकले आणि त्यासाठीची ताकद शरीरात साठवलेल्या शक्तीतून आली, त्यांनी नुकत्याच घेतलेल्या आहारातून नव्हे. तसेच असेही दिसून आले की सकाळी व्यायाम केलेल्यांनी जास्त प्रमाणात कॅलरी गमावल्या नाहीत किंवा त्यांना जास्त भूकही लागली नाही. तसेच ज्यांनी रिकाम्या पोटी व्यायाम केला त्यांनी खाऊन व्यायाम केलेल्यांच्या तुलनेत 20 टक्के जास्त फॅट कमी केले. याचा अर्थ असा की रिकाम्या पोटी व्यायाम करणे हा फॅट कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

हे आहेत रिकाम्या पोटी व्यायामाचे दुष्परिणाम

काहीही न खाता व्यायाम केल्यामुळे काही वाईट परिणामही होऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर कमी होऊन थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. खाऊन केलेल्या व्यायामाच्या तुलनेत आपण व्यायामात कमी पडू शकता आणि चिडचिडेपण जाणवू शकते. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी व्यायामाआधी काहीतरी खाणे हे महत्त्वाचे आहे, खासकरून ते सकाळी उठल्या उठल्या व्यायाम करत असतील तर.

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे फायदे

जेव्हा शरीर उपवासाच्या अवस्थे असते तेव्हा शरीरातले तंत्र स्नायू आणि मेंदूला आवश्यक असलेली साखर इंधन म्हणून पुरवते. शरीरातली साठवलेली साखर संपल्यानंतर शरीर आपल्या शरीरातील चरबीचे रुपांतर साखरेत करू लागते. यामुळे असे म्हणता येऊ शकते की जेव्हा शरीरात साखरेची कमतरता असते तेव्हा फॅट जास्त वेगाने कमी होते. तसेच रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे फॅट लवकर कमी होते या मताला आधार देण्यासाठी काही संशोधनेही उपलब्ध आहेत.

व्यायामाआधी खाताना या गोष्टी ठेवा लक्षात

  • व्यायामाआधी आपण अर्धे केळे किंवा एक चमचा लोणी किंवा एक उकडलेले अंडे खाऊ शकता.
  • व्यायाम करून झाल्या
  • वर आपण पाणी पिऊ शकता, पण काहीही खाण्यापूर्वी 60 ते 90 मिनिटांचा अवधी जाऊ द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी