पावसाळ्यात दही सेवन करणं योग्य की आयोग्य? जाणून घ्या सत्य

दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि त्यांचा आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो.  यामुळे नियमितपणे दही खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. दह्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, शुगर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् असे अनेक पोषक घटक आढळतात.

Is it right or wrong to consume curd in rainy season?
पावसाळ्यात दही सेवन करणं योग्य की आयोग्य?   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या ऋतुत दही खाताना दही खूप आंबट किंवा खूप दिवस जुनं नसावं.
  • नियमितपणे दही खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं.

मुंबई : दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि त्यांचा आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो.  यामुळे नियमितपणे दही खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. दह्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, शुगर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् असे अनेक पोषक घटक आढळतात. परंतु पावसाळ्यात दही खाणं हे आरोग्यासाठी योग्य कि अयोग्य याविषयी काही समज-गैरसमज आहेत. 

पावसाळ्यात दही खावे का?

मात्र आता पावसाळा सुरू आहे. उन्हाळ्यात दही खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, परंतु पावसाळ्यात दही खावं का? याविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे या ऋतूत दही खाणं अतिशय फायदेशीर असते. परंतु याचं सेवन करताना काही काळजी घेणे गरजेचे असते.

या ऋतुत दही खाताना  दही खूप आंबट किंवा खूप दिवस जुनं नसावं. तसंच पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस दही खाणं शक्यतो टाळावे. परंतु दिवसा तुम्ही जेवणासोबत दही खाऊ शकता. पावसाळ्यात अनेकदा फूड पॉयझनिंगचा आणि डायरियाचा होतो. अशा स्थितीत दही खाणं आणि ताक पिणं फायदेशीर ठरू शकतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी