Weight Loss Food: ही एक गोष्ट खाल्ल्याने वजन झपाट्याने होईल कमी; ॲसिडीटीपासूनही मिळेल आराम

तब्येत पाणी
Updated Jun 17, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Isabgol Benefits | लठ्ठपणा कमी करणे ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात कठीण समस्या बनली आहे. यासाठी अनेकवेळा आरोग्यदायी आहार घ्यावा लागता आणि जिममध्ये घाम गाळावा लागतो.

Isabgol is very effective for weight loss, know its benefits
ही एक गोष्ट खाल्ल्याने वजन झपाट्याने होईल कमी, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणा कमी करणे ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात कठीण समस्या बनली आहे.
  • इसबगोलला सायलम हस्क असेही म्हणतात.
  • इसबगोलमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळतात.

Isabgol For Weight Loss । मुंबई : लठ्ठपणा कमी करणे ही आजच्या धावपळीच्या जीवनातील सर्वात कठीण समस्या बनली आहे. यासाठी अनेकवेळा आरोग्यदायी आहार घ्यावा लागता आणि जिममध्ये घाम गाळावा लागतो. तरीदेखील लठ्ठपणापासून सुटका होत नसल्याची तक्रार होत असते. कोरोना व्हायरसची महासाथी (Coronavirus Pandemic) सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉर्म होम (Work From Home) यामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढले आहे. दरम्यान आता लोकांना वजन कमी करणे खूप कठीण झाले आहे. (Isabgol is very effective for weight loss, know its benefits). 

अधिक वाचा : कुंडलीत कमजोर असलेला बुध ग्रह जीवनात आणतो अनेक समस्या

वजन कमी करण्यासाठी खावा इसबगोल

जर तुम्हाला वाढते वजन कमी करायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय अवलंबू शकता. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात इसबगोलचे सेवन करू शकता. कदाचित तुम्ही या पदार्थाचे नाव ऐकले नसेल पण याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही लगेचच याचे रोज सेवन करायला सुरूवात कराल. 

इसबगोलचे अनेक फायदे

इसबगोलला (Isabgol) सायलम हस्क असेही म्हणतात. आरोग्य तज्ञ म्हणतात की, यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आतड्याची हालचाल आणि एन्झाईम्स अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करतात. इसबगोलचा फायदा केवळ वजन कमी करण्यातच नाही तर रक्तदाब आणि हृदयविकारापासून बचाव करण्यातही होतो. हे प्रीबायोटिक म्हणून काम करते. याच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. इसबगोल तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि तुमचे पोट भरलेले वाटते. त्यामुळे तुम्ही कमी अन्नाचे सेवन करता त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

वजन कसे कमी करते इसबगोल? 

इसबगोलमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळतात, मात्र ते खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही कारण पोट भरल्यासारखे वाटते, जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात ते खाल्ले तर वजन झपाट्याने कमी होते आणि पोटाची चरबीही कमी होते. 

ॲसिडीचा त्रासही होईल दूर 

इसबगोलमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि पोटाचा त्रास दूर होतो. तसेच ते खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

इसबगोलचा कसा वापर करायचा? 

तुम्ही इसबगोल पाण्यात किंवा रसात मिसळून पिऊ शकता. काही लोक त्याचे सरबत तयार करून पितात. २ चमचे इसबगोल पाण्यात मिसळले तर ते एक ग्लाससाठी ते पुष्कळ आहे. सहसा लोक सकाळी रिकाम्या पोटी ते खातात, परंतु दिवसातून दोनदा ते सेवन केले जाऊ शकते.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी