Health: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते शुभ, अशा लोकांचे भाग्य नेहमी उजळतं

Health: ज्योतिष शास्त्रात मानवी शरीरावरील सर्व तीळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. केवळ एवढंच नव्हे तर शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं शुभ मानलं जातं ते पाहुया.

It is considered auspicious to have moles on these parts of the body
ज्योतिष शास्त्रानुसार इथे तीळ असणं शुभ, या लोकाचं भाग्य उजळतं  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ
  • या भागांवर तीळ असणाऱ्यांचं भाग्य उजळतं
  • शरीरावर लाल तीळ असणं शुभ मानलं जातं

Health: ज्योतिष शास्त्रात मानवी शरीरावरील सर्व तीळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. केवळ एवढंच नव्हे तर शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की शरीराच्या इतर भागात काळे तीळ असल्‍याने शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम होतात. यासोबतच शरीरावर असणाऱ्या चामखिळचा तिळांवर प्रभाव असतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेले तीळ याचा अर्थ जाणून घेऊया. 


ओठावर तीळ

स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. याऊलट ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास, जोडीदाराशी मतभेद होतात. तर दुसरीकडे ज्या लोकांच्या खालच्या ओठांवर तीळ असतो ते खवय्ये असतात. तसेच, असे लोक त्यांच्या क्षेत्रात यश मिळवतात.

छातीवर तीळ

छातीवर डाव्या बाजूला तीळ किंवा चामखीळ असेल तर त्या व्यक्तीचे मोठे वयात लग्न होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती अत्यंत कामुक असतात. त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता असते. दुसरीकडे, ज्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते धनवान असतात आणि त्यांचा जोडीदारही देखणा आणि सर्वगुण संपन्न असतो.


तळहातावर तीळ

तळहातावरच्या अंगठ्याच्या खालच्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्यांच्या तळहातावर तीळ असतो, त्यांना जीवनात अपार यश मिळते. अंगठ्यावर तीळ असेल तर त्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी त्याला यश मिळत नाही.

पोटावर तीळ

ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतात ते खूप खाण्याचे शौकीन असतात. जर तीळ बेंबीच्या डाव्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीला पोटाचा त्रास होतो. 
ज्यांच्या बेंबीच्या खाली तीळ असतो त्यांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


कपाळावर तीळ

ज्या व्यक्तीच्या कपाळावर उजवीकडे आणि डावीकडे तीळ असतो, तो खूप पैसा कमावतो. पण त्याच्याकडे पैसा टिकत नाही. अनेक वेळा त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो. दुसरीकडे ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. नशीब अशा लोकांना मदत करते. ज्या क्षेत्रात ते प्रयत्न करतात त्यात त्यांना यश लाभतं आणि ते जीवनात यशस्वी होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी