Health Tips: ही ५ पाने चावल्याने झपाट्याने कमी होईल वजन; पोटाचे आरोग्यही सुधारेल 

तब्येत पाणी
Updated May 25, 2022 | 10:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Tips For Weight Loss | आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे ते लठ्ठपणाची शिकार होतात.

It will lose weight fast by biting 5 leaves, Stomach health will also improve
ही ५ पाने चावल्याने होईल झपाट्याने वजन कमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
  • पुदिन्याचे नाव ऐकताच मनामध्ये एक गोड सुगंध दरवळतो.
  • रोझमेरी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात.

Health Tips For Weight Loss | मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे ते लठ्ठपणाची शिकार होतात. वेळेअभावी ते जिमलाही जाऊ शकत नाहीत आणि वर्कआउट देखील करू शकत नाही. त्यामुळे वाढत्या वजनामुळे लोक अस्वस्थ होतात आणि कधी कधी डिप्रेशनमध्येही जातात. पण आता यावर रामबाण उपाय समोर आला आहे. कारण काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. ५ प्रकारच्या वनस्पतींची पाने चावल्याने वजन नियंत्रणात आणले जाऊ शकते. (It will lose weight fast by biting 5 leaves, Stomach health will also improve). 

अधिक वाचा : एअरटेल, जिओ, व्हीआयचे प्लॅन महागणार

पुदीन्यामध्ये अनेक प्रभावी गुण 

पुदिन्याचे नाव ऐकताच मनामध्ये एक गोड सुगंध दरवळतो. याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे केवळ खाण्यापिण्याची चवच वाढवत नाहीत. तर यासोबतच वजन नियंत्रित ठेवते. खर तर पुदिन्यात भूक कमी करणारे अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे भूक कमी लागते. कमी खाल्ल्याने शरीराला कमी प्रमाणात कॅलरीज मिळतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच गॅस आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.

अजमोदाची पाने चावून मिळवा लठ्ठपणावर नियंत्रण

अजमोदा अर्थात ओवा गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे एक नैसर्गिकरित्या लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे जे पाणी टिकवून ठेवण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर त्यात युजेनॉल असते जे रक्तातील साखर नियंत्रित करते. हे हायपरग्लेसेमियावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

अजवाइन पचन शक्ती मजबूत करते

अनेक वेळा लोकांना अजवाइन पाण्यात भिजवून प्यायला सांगितले जाते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण फार कमी लोकांना माहित आहे की अजवाइनच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यात पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखी बायोएक्टिव्ह गुण असतात. जे चयापचय सुधारण्यासोबतच डायबिटीजला देखील नियंत्रित करते. हे पान खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे पचनशक्तीही मजबूत होते.

रोझमेरी वजन कमी करण्यासाठी प्रभावी 

रोझमेरी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात. यासोबतच ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते. रोझमेरीमध्ये असलेले कार्नोसिक ॲसिड वजन कमी करण्यास मदत करते.

डोंगरातील पुदीना खा आणि करा वजन कमी

डोंगराळ भागातील पुदीना वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पीसीओस सारख्या काही हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढत असते. हा पहाडी पुदीना पेपरमिंट इस्ट्रोजेन पातळी वाढविण्यात मदत करू शकतो. यामुळे वजनही वाढते. दरम्यान पहाडी पुदिना हार्मोनल संतुलन राखते तसेच अतिरिक्त वजन कमी करते. महिलांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी