रोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे...

तब्येत पाणी
Updated Mar 29, 2019 | 16:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Health Benefit : गूळ हा शरीरासाठी चांगला असतो. साखरेच्या तुलनेत गूळ हा नैसर्गिक असल्याने तो खाण्याचा सल्ला दिला जातो.

jaggery and water
गूळ आणि पाणी 

मुंबई : सकाळी उठताच अनेक लोकांना चहा पिण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. सकाळी उठल्यावर तोंड न धुता तुम्ही चहाऐवजी गूळ आणि गरम पाणी प्यायलात तर याचे आरोग्यास अगणित फायदे होतील. आयुर्वेदामध्ये याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदामध्ये अनेकाविध आजारांचे नैसर्गिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही गोड पदार्थ खाण्याचे शौकीन आहात तर तुम्हाला गुळाबाबत चांगलीच माहिती असेल. 

दररोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केले तर शरीरामध्ये एनर्जी येते. याशिवाय याचे अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया याचे फायदे...

सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पिण्याचे फायदे

  1. रक्त साफ होण्यास मदत - गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्त साफ होण्यास मदत होते. गूळाच्या सेवनाने शरीरात नवे रक्त तयार होते. हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.
  2. शरीराची ताकद वाढते - जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर दररोज सकाळी गुळाचे सेवन जरूर करा. यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यासोबतच रक्तातील साखर वाढत नाही.
  3. पाचनक्षमता वाढते - ज्यांना जेवण जेवल्यानंतर ते पचण्यास अडथळा निर्माण होतो अशा व्यक्तींनी नियमितपणे गुळाचे सेवन केलेच पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीच्या समस्या दूर होतात. 
  4. ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो - गूळ ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करेत. ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. ही दोनही पोषकतत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत ठेवता. गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
रोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे... Description: Health Benefit : गूळ हा शरीरासाठी चांगला असतो. साखरेच्या तुलनेत गूळ हा नैसर्गिक असल्याने तो खाण्याचा सल्ला दिला जातो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...