Jaggery Benefits in Marathi :मुंबई : शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला अशक्तपणा जाणवतो. कधी कधी यामुळे भोवळही येते. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर, डाळींब, बीट आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्ही हे उपाय करून थकला असाल तर अशक्तपणा दूर करण्यासाठी आणखी एक पर्याय आहे. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी गुळ फायदेशीर ठरतं. गुळाचे नियमित सेवन केल्याने रत्काचे प्रमाण वाढते हे फार कमी जणांना माहित आहे. जाणून घेऊया गुळाचे आणखी फायदे
गुळाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते असे निष्कर्ष अनेक संशोधनातून समोर आले आहे. इतकेच नाही तर गुळामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होतं. गुळात विटामिन ए, विटामिन बी, सुक्रोज, ग्लुकोज, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि मॅग्निशयम असतं. तसेच गुळात अनेक विटामिन असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. म्हणून गुळाचे सेवन केल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते असे सांगितले जाते.