JANHVI KAPOOR BEAUTY TIPS: एकीकडे बॉलीवूडमध्ये आपल्या कामाची झलक दाखवणाऱ्या जान्हवी कपूरच्या अभिनयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे तिचे सौंदर्यही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या तरुण पिढी या चेहऱ्याकडे खूप आकर्षित होत आहे. जान्हवीला नेहमी तिच्या ब्युटी सिक्रेटबद्दल विचारले जाते. तर आज आम्ही तुम्हाला जान्हवीच्या सुंदर त्वचेचे रहस्य सांगणार आहोत कारण या ब्युटी सिक्रेटमध्ये महागडे सौंदर्य उत्पादने नसून स्वयंपाकघरातील नैसर्गिक साहित्य आहे. ज्याचा वापर करून जान्हवी प्रत्येक आपल्या त्वचेची काळजी घेते.
जान्हवीसारखी चमकदार त्वचा आणि नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्हीही अभिनेत्रीचं हे स्किनकेअर रुटीन फॉलो करू शकता. स्किनकेअरसाठी जान्हवीच्या सर्वात आवडत्या गोष्टी म्हणजे दूध, मलई, मध, दही, गुलाबजल आणि फळे. जान्हवीला सर्वांचा चेहऱ्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा हे चांगलेच माहित आहे.
जान्हवीच्या चमकदार त्वचेचे रहस्य
जान्हवी कपूरच्या चमकदार त्वचेमागील सर्वात मोठे रहस्य म्हणजे तिचा संतुलित/हेल्दी डाएट आणि परफेक्ट वर्कआउट रूटीन. जान्हवी तिच्या रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये कधीही आळशीपणा करत नाही, चमकदार त्वचेसाठी योग्य वेळी आंघोळ, झोपणे, खाणे आवश्यक आहे. चेहर्याची चमक, हायड्रेशन आणि योग्य आहारामुळे कायम राहते. जान्हवी तिची स्किन हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे शरीराला पाण्याची कमतरता भासू देत नाही. ती सतत पाणी, नारळपाणी आणि ज्यूस पिते त्याचबरोबर सॅलड आणि फळे खाते.
अधिक वाचा: Tips: या टिप्स वापरल्याने सकाळ होईल एकदम फ्रेश
जान्हवीकडून घ्या ब्युटी टिप्स
जान्हवी तिच्या दिवसाची सुरुवात थंड पाण्याने चेहरा धुवून करते. त्यानंतर, चेहऱ्याला लाइट क्लीनिंग करणे आणि त्वचेच्या टोननुसार फेस सीरम लावते.
शॉवरनंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे जान्हवीच्या मस्ट डू लिस्टमध्ये येते. ज्यामुळे तिची त्वचा हायड्रेटेड राहते तसेच सूर्यप्रकाश, धूळ, माती आणि कोणत्याही प्रकारच्या हानिकारक किरणांपासून दूर राहते.
अधिक वाचा: निरोगी आणि मजबूत हिरड्या हव्या आहेत? मग हे करा
जान्हवी चेहऱ्यावरच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी शीट मास्क आणि नैसर्गिक फेस मास्क लावते.
निरोगी आणि फ्रेश त्वचेसाठी जान्हवी ध्यान, हायड्रेशन, योग, नृत्य, वर्कआउट्सवर पूर्ण लक्ष देते.
रात्री झोपण्यापूर्वी जान्हवी नेहमीच तिचा मेकअप गुलाबपाणी आणि ग्लिसरीनने काढते ती नैसर्गिक टोनिंग आणि त्वचेच्या स्वच्छतेसाठी दूध आणि दही वापरते. ज्यामुळे सुरकुत्या, फाइन लाईन्स, टॅनिंग, सन बर्न यासह त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
अधिक वाचा: जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?
जान्हवी त्वचेला टॅनिंग आणि निस्तेज करण्यासाठी मधाचा वापर करते.
स्किन एक्सफोलिएशन हा देखील जान्हवीच्या स्किनकेअरचा एक खास भाग आहे, नैसर्गिक स्क्रबने एक्सफोलिएशन केल्याने त्वचा चमकदार राहते.