जांभूळ आपल्याला आरोग्यपूर्ण ठेवण्यास करते खूप मदत, लठ्ठपणापासूनही देते सुटका

एका संशोधनात पुढे आलेल्या माहितीनुसार जांभूळ खाल्ल्याने मधुमेहाची समस्या दूर ठेवण्यास मदत होते. याच्या बियांमध्ये जम्बोलिन आणि जम्बोसिन हे दोन प्रमुख बायोअॅक्टिव्ह कंपाऊड्स असतात ज्यामुळे इन्सुलिन वाढते.

Java plum fruit
जांभूळ आपल्याला आरोग्यपूर्ण ठेवण्यास करते खूप मदत, लठ्ठपणापासूनही देते सुटका  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मधुमेहाममध्ये जांभूळ असते गुणकारी
  • वजन कमी करण्यात असते सहाय्यकारी
  • दात मजूबत ठेवण्यास करते मदत

Java plum benifits ।  नवी दिल्ली: उन्हाळ्याच्या मौसमातले (Summer season) एक प्रमुख फळ (fruit) म्हणजे जांभूळ (java plum). काळी मिरची (black chilly) आणि मिठासोबत (salt) जांभूळ खाण्याची मजा काही औरच असते. मात्र जांभळाची फक्त चवच (taste) नाही, तर आरोग्याच्या (health) दृष्टीनेही याचे फायदे (benefits) महत्वाचे असतात हे फार कमीजणांना ठाऊक आहे. जांभळात असे अनेक औषधी गुण (medicinal qualities) असतात जे अनेक समस्यांपासून (problems) आराम (relief) देतात. जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.

मधुमेहाममध्ये जांभूळ असते गुणकारी

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जांभूळ खाल्ल्याने डायबिटीजच्या समस्येपासून आराम मिळतो. याच्या बियांमध्ये जम्बोलिन आणि जम्बोसिन हे दोन प्रमुख बायोअॅक्टिव्ह कंपाऊड्स असतात ज्यामुळे इन्सुलिन वाढण्यास मदत होते आणि यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होते.

उच्च रक्तदाबाच्या समस्येतही मदत करते जांभूळ

जांभळाच्या बियांमध्ये एलाजिक आम्ल आढळते जे एक पावरफुल अँटीऑक्सिडंट असते. हे उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत होते.

वजन कमी करण्यात असते सहाय्यकारी

जांभळाचा गर आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. यासोबतच पचनक्रियेतही मदत होते. याशिवाय अल्सरच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

त्वचेच्या समस्याही ठेवते दूर

जांभूळ हे त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते. याच्या बिया सुरकुत्या दूर करण्यास मदत करतात.

दात मजूबत ठेवण्यास करते मदत

जांभळाच्या पानांमध्येही जिवाणुविरोधी तत्वे असतात. यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी सहाय्यकारी

जांभळात मुबलक प्रमाणात लोह आणि जीवनसत्व क असते. यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते आणि त्याची पातळी योग्य राखली जाते.

(डिस्क्लेमर: हा लेख सामान्यज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याआधी डॉक्टर किंवा संबंधित क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी