रूग्णवाहिकेसाठी लक्षात ठेवा 'हे' दोन नंबर, Emergency काळात येतील मदतीस

सध्याच्या परिस्थितीत कोणाला कसला आजार समोर येईल, याची कोणालाच कल्पना नसते. अशावेळी तात्काळ रूग्णवाहिकेची आवश्यकता असते.

Ambulance Service
रूग्णवाहिकेसाठी लक्षात ठेवा 'हे' दोन नंबर 
थोडं पण कामाचं
  • कोणतीही आपातकालीन घटना उद्धभवल्यानंतर रूग्णवाहिका कशी मागावायची?
  • रूग्णवाहिकेसाठी कोणत्या नंबरवर फोन करायचा असे प्रश्न पडतात.
  • जेव्हाही तुम्हाला या सेवेची गरज असेल तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.

नवी दिल्ली: Ambulance Service: सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. कधी कोणावर कशी परिस्थिती येईल सांगू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणाला कसला आजार समोर येईल, याची कोणालाच कल्पना नसते. अशावेळी तात्काळ रूग्णवाहिकेची आवश्यकता असते. मात्र कोणतीही आपातकालीन घटना उद्धभवल्यानंतर रूग्णवाहिका कशी मागावायची, रूग्णवाहिकेसाठी कोणत्या नंबरवर फोन करायचा असे प्रश्न पडतात आणि एकच गोंधळ होऊन जातो. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, गंभीर काळजी सेवा, लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी रुग्णवाहिका सेवा चालविली जाते. जेव्हाही तुम्हाला या सेवेची गरज असेल तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. 

नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत 102 आणि 108 नंबर डायल करून रुग्णवाहिका सुविधेचा लाभ घेता येतो. या अभियानांतर्गत देशातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रुग्णवाहिका सेवा पुरवत आहेत.

अधिक वाचा-  महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, 'या' सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या राज्यातील पावसाची सद्यस्थिती 

काय आहे 102 आणि 108 क्रमांक

राष्ट्रीय आरोग्य अभियानानुसार, रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन दोन प्रकारची रुग्णवाहिका सेवा प्रधान केली जाते. या आधारे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना फोनद्वारे रुग्णवाहिका सुविधेचा लाभ घेता येतो. 

102 नंबर

या अंतर्गत सर्वसामान्य गरजांसाठी रुग्णवाहिका सेवा घेता येणार आहे. याशिवाय गरोदर महिला आणि बालकांच्या उपचारासाठीही या सेवेचा वापर करता येईल. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत, अनेक राज्ये पात्र रूग्णाची हॉस्पिटलमध्ये मोफत डिलिव्हरी, दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये रेफर केल्यावर आणि मुलाला आणि आईला मोफत घरी नेण्याची सुविधा देतात.

अधिक वाचा- मुंबईत पावसाचा जोर वाढला, लोकलही ट्रेन स्लो; जाणून घ्या शहरातील पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

108 नंबर

याअंतर्गत गंभीर रूग्ण, अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर रूग्णालयात दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
देशभरात सुमारे 26 हजार रुग्णवाहिका कार्यरत

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 108 सेवांसाठी 10,993 रुग्णवाहिका आणि 102 सेवांसाठी 9995 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. याशिवाय 5126 रुग्णवाहिका काही राज्यांकडून वेगवेगळ्या योजनांद्वारे गर्भवती महिला आणि बालकांसाठी स्वतंत्रपणे वापरण्यात येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी