पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टोमॅट फिव्हरचा धोका

Kerala Tomato Fever Cases Updates Children Found Infected In Kollam : केरळमधील कोल्लममध्ये टोमॅटो फिव्हरचे ८२ रुग्ण आढळले आहेत. यात पाच वर्ष किंवा त्यापेक्षा लहान वयाच्या मुलांची संख्या लक्षणीय आहे.

Kerala Tomato Fever Cases Updates Children Found Infected In Kollam
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टोमॅट फिव्हरचा धोका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टोमॅट फिव्हरचा धोका
  • टोमॅटो फिव्हर हा एक व्हायरल फिव्हर (विषाणूची बाधा झाल्यामुळे येणारा ताप)
  • टोमटो फिव्हर झालेल्यांच्या शरीरावर लाल रंगाचे फोड येतात

Kerala Tomato Fever Cases Updates Children Found Infected In Kollam : कोल्लम : केरळमधील कोल्लममध्ये टोमॅटो फिव्हरचे ८२ रुग्ण आढळले आहेत. यात पाच वर्ष किंवा त्यापेक्षा लहान वयाच्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. कोल्लमच्या सरकारी हॉस्पिटलने टोमॅटो फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टोमॅट फिव्हरचा जास्त धोका आहे, असेही हॉस्पिटलने सांगितले. 

टोमॅटो फिव्हर हा चिकनगुनिया किंवा डेंग्यू या आजारांचा परिणाम म्हणून होणारा आजार आहे की एक नवा आजार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण टोमॅटो फिव्हरच्या रुग्णांची संख्या ८० पेक्षा जास्त झाल्यामुळे केरळ सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी टोमॅटो फिव्हरबाबत केरळ सरकारने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 

टोमॅटो फिव्हर हा एक व्हायरल फिव्हर (विषाणूची बाधा झाल्यामुळे येणारा ताप) आहे. या आजाराचे रुग्ण वाढू नये म्हणून केरळ सरकारने अंगणवाडी केंद्र तात्पुरती बंद केली आहेत. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार टोमटो फिव्हर झालेल्यांच्या शरीरावर लाल रंगाचे फोड येतात. त्वचेची आग आग होते. घसा कोरडा पडतो आणि वारंवार तहान लागते. शरीरातील पाण्याची पातळी खालावते. तापाने अंग फणफणते, अल्पावधीत तापाची तीव्रता वाढते, अंगदुखी आणि सांधेदुखी सुरू होते, तोंडाच्या आतमध्ये फोड आल्यामुळे जेवण जेवणे कठीण होते. त्वचेचा रंग फिका होऊ लागतो. 

टोमॅटो फिव्हरशी संबंधित लक्षणे आढळल्यास जवळच्या दवाखान्यात अथवा हॉस्पिटलमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार आणि औषधोपचार सुरू करणे तसेच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आजारी व्यक्तीने ताजी फळे, ताजे सकस अन्न यांचे सेवन करावे. शक्यतो वरण भातासारखा हलका आहार घ्यावा. कोमट पाण्याने दिवसातून एकदा किंवा दोनदा आंघोळ करावी. 

त्वचेवरील फोड फोडू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी. पालकांनी टोमॅटो फिव्हर झालेल्या मुलांसोबत वेळ घालवावा. टोमॅटो फिव्हर झालेल्यांना बरे होईपर्यंत इतर मुलांसोबत मिसळू देऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी