Snake Bite Death Time: 'हे' ५ साप चावले तर माणूस पाणीही मागत नाही!

Indian Snake Bite Death Time: इंडियन कोब्रा (नाग) किंवा रसेल वाइपर... हे जगातील काही सर्वात विषारी साप आहेत जे भारतातही आढळतात. भारतातील अशा सापांनी जर दंश केला तर माणूस पाणीही मागत नाही.

king cobra viper common krait russells viper saw scaled viper 5 indian snakes bite then person does not even ask for water
'हे' ५ साप चावले तर माणूस पाणीही मागत नाही!  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या भारतात कोणकोणते विषारी साप आहेत
  • भारतात फक्त पाच विषारी आढळून येतात
  • किंग कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसा, नाग हे भारतात आढळणारे पाच विषारी साप आहेत

India Venomous Snake: साप (Snake) अनेकदा हे माणसांना दंश करतात. कधी जंगलात (Forest) आणि झाडाझुडपांमध्ये तर कधी काँक्रीटच्या घरांमध्येही साप दिसतात. तज्ज्ञांच्या मते, बहुतेक साप हे विषारी नसतात, परंतु भारतात जे काही विषारी साप (Venomous Snake) आढळतात ते अतिशय धोकादायक आहेत. भारतात असे काही विषारी साप आहेत जे चावल्यानंतर काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होतो. (king cobra viper common krait russells viper saw scaled viper 5 indian snakes bite then person does not even ask for water)

अलीकडे सोशल मीडियावर साप पकडण्याचे व्हिडीओ तयार करुन शेअर करण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. धोका किती मोठा आहे हे माहित नसल्यास सापांपासून दूर राहणं योग्य आहे. नाग, घोणस, फुरसे, मण्यार हे इतके विषारी साप आहेत की त्यांच्या दंशानंतर अवघ्या काही मिनिटात माणसाचा मृत्यू होतो.

अधिक वाचा: Snake Attack Viral Video : सापाशी खेळणे पडले महागात, पहा हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ

1. नागराज (King Cobra)

नागराज (King Cobra) हा जगातील सर्वात विषारी साप आहे. त्याची लांबी साडेपाच मीटरपर्यंत असू शकते. तो जमिनीपासून 2 मीटर उंचीपर्यंत आपला फणा काढू शकतो. इतर सापही किंग कोब्रापासून लांब पळतात. कारण हा नाग इतर सापांनाही खाऊन टाकतो.

किंग कोब्राची गणना भारतातच नाही तर जगातील सर्वात विषारी सापांमध्ये केली जाते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे किंग कोब्राला आपल्या आपलं भक्ष्य मिळविण्यासाठी त्याला दंश करण्याची गरज नाही.  कारण किंग कोब्रा हा तब्बल 2 मीटर अंतरावरून आपलं विष फेकून भक्ष्याला आंधळे करू शकता.

अधिक वाचा: King Cobra Attack : कोब्राने केला लहान मुलावर हल्ला, पुढचं दृश्य पाहून बसेल शॉक, पाहा VIDEO

सामान्यतः घनदाट जंगले, दलदल आणि बांबूचे वन या ठिकाणी शक्यतो  किंग कोब्रा सापडतात. नागाचा एकच दंश हा माणसाला संपविण्यासाठी पुरेसा असतो. किंग कोब्रा चावल्यानंतर ३० मिनिटांच्या आत जर अँटी व्हेनम मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होतो.

2. मण्यार (Common Krait)


खेडेगावात आणि जंगलात मण्यार हा विषारी साप अनेकदा सापडतो. देशात माणसांना सर्वाधिक चावणारा साप हा मण्यार असल्याचं समोर आलं आहे. मण्यारच्या विषामध्ये असे न्यूरोटॉक्सिन असते की ज्यामुळे शरीर काम करणं थांबवतं आणि 45 मिनिटांत व्यक्तीचा मृत्यू होतो. मण्यार सापाची लांबी 6.5 फूटापर्यंत आहे. या सापाचं आयुष्य 10 ते 17 वर्षे वयापर्यंत जगतात.

अधिक वाचा: Snake Video : मुलावर नागाने उगारला फणा, आईने दाखवली चपळाई! पाहा व्हिडिओ


3. घोणस (Russell's viper)


घोणस हा विषारी साप भारतात सर्वत्र आढळतो. इतर कोणत्याही सापापेक्षा घोणस सापाने सर्वाधिक भारतीयांचा जीव घेतला आहे. हा साप  चावण्यापूर्वी जोरजोरात फुत्कारतो. घोणसच्या एका दंशातून हेमोटॉक्सिन बाहेर पडते जे थेट मध्यवर्ती मज्जासंस्थेला अर्धांगवायूचा झटका देते. घोणस चावल्यास अंतर्गत रक्तस्राव सुरु होतो आणि तीव्र वेदना होतात आणि मेंदूमध्येही रक्तस्त्राव होतो. जर अँटी-वेनम न मिळाल्यास व्यक्तीचा अवघ्या ४५ मिनिटात मृत्यू होतो. घोणस हा साप रात्री खूप सक्रिय असते जो मानवांसाठी अधिक धोकादायक बनतो.

4. फुरसे (Saw scaled viper)


फुरसा हा साप दिसायला खूप लहान असतो, पण तो प्रचंड विषारी असतो. त्याचे मोठे डोळे, रुंद डोके यामुळे तो इतर सापांपेक्षा वेगळा ठरतो. सामान्यतः वालुकामय, खडकाळ आणि मऊ मातीच्या भागात आढळणारा हा साप २.६ फूट लांबीपेक्षा जास्त नसतो. भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी हा सर्वात लहान साप आहे. हा साप चावल्यामुळे जगात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. या सापावर अँटी-वेनम उपलब्ध आहे पण तरीही मृत्यूदर 20% आहे. म्हणजे प्रत्येकी पाच बळींपैकी एकाचा मृत्यू होतो.

अधिक वाचा: Snake in Commode : कमोडवर बसणार इतक्यात बाहेर आला साप, फुटला घाम, पाहा VIDEO

5. नाग (viper)

कोब्राचे अनेक प्रकार भारतात आढळतात, परंतु सर्वात सामान्य नाग आहे. सर्पदंशाच्या बहुतांश घटना यातूनच घडतात. त्याचा फणा हा त्याला आकर्षक बनवतं. त्याचा लांबी 7 फुटापर्यंत असू शकते आणि संपूर्ण भारतात हा आढळतो. या सर्पदंशाने दोन तासांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. नागाच्या विषामुळे शरीर सुन्न होते. श्वसन प्रणाली निकामी होऊ शकते तसेच हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी