Bathing Mistakes: आंघोळीपूर्वी करू नका ‘ही’ ५ कामं, नाहीतर होऊ शकतात गंभीर समस्या

तब्येत पाणी
Updated May 18, 2020 | 21:13 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shower Mistakes: आंघोळ करण्यापूर्वी आपण जास्त विचार करत नाही, जेव्हा वाटतं तेव्हा आंघोळीला जातो. पण काही कामं अशी असतात जी आंघोळीपूर्वी करू नयेत. जाणून घ्या याबाबत...

5 bath mistakes
हे पाच काम केल्यानंतर मात्र लगेच आंघोळ करू नये  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • आंघोळ करणं आपल्या दररोजच्या रूटीनचा एक अविभाज्य भाग आहे.
  • हे पाच काम केल्यानंतर मात्र लगेच आंघोळ करू नये, नाहीतर होतात गंभीर परिणाम
  • त्यामुळे हे पाच काम केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास उलटून गेल्यानंतर आंघोळ करावी.

मुंबई : अनेकांना सकाळी-सकाळी आंघोळ करणं आवडत असतं. मात्र काही असे पण लोक आहेत, ज्यांना संध्याकाळी आंघोळ करायला आवडते. अनेकांच्या मते सकाळी आंघोळ केल्यानंतर संपूर्ण दिवस आपण फ्रेश राहतो तर काही जण संध्याकाळी आंघोळ करतात जेणेकरून त्यांना रात्री चांगली झोप यावी, अशी इच्छा असते. प्रत्येक जण आपआपल्या सोयीनं आंघोळ करतात. मात्र काही असे काम आहेत, जे केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. काही वेळानंतर आंघोळ केली तर चालते. हे आपल्याला ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण असं न केल्यास आपल्याला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आंघोळ करणं आपल्या डेली रुटीनचा एक भाग आहे. अशातच आंघोळीची योग्य वेळ त्यासोबतच काही काळजी घेणं आवश्यक आहे. जर आपण काही गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर आरोग्याशी संबंधीत समस्या आपल्याला होणार नाहीत. आपल्या दररोजच्या कामांमध्ये असे अनेक कामं असतात, जे केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. कारण यामुळे डोकेदुखी, ताप किंवा हृदयाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून हे काम करण्याच्या काही वेळानंतर आंघोळ करणं योग्य ठरेल.

तर मग जाणून घ्या कोणते आहेत हे कामं जे केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये

  • बाहेरून आल्यानंतर- जर आपण कुठून बाहेरून येत असाल तर लगेच आंघोळ करू नये. कारण उन्हातून बाहेरून आल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते. शरीरावर पाणी पडल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान अचानक कमी होतं. त्यामुळे डोकेदुखी किंवा ताप येऊ शकतो. म्हणून कधीही बाहेरून आल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, कमीतकमी अर्धा तास बॉडी नॉर्मलला येऊ द्यावी आणि नंतर आंघोळ करावी.
  • जेवण केल्यानंतर लगेच – नेहमीच घरातील ज्येष्ठ मंडळी आंघोळीनंतर जेवू नका असं सांगतांना आपण पाहिलं असेल. असं सांगण्याचं कारण की, जेवण केल्यानंतर शरीरातील ऊर्जा जेवणाचं पचन करण्याचं काम करत असते. त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. अशात जर लगेच आपण आंघोळ कराल तर शरीरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आंघोळीनंतर शरीराचं तापमान कमी होतं म्हणून जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये.
  • झोपून उठल्यानंतर लगेच – झोपून उठल्यानंतर लगेच आंघोळ केली तर आपल्याला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू होऊ शकतो. झोपतांना शरीराचं तापमान अधिक असतं आणि शरीरात ब्लड फ्लो पण झपाट्यानं होत असतो. त्यामुळे झोपून उठल्यानंतर लगेच आंघोळ केली तर शरीराला त्याचा अपाय होऊ शकतो. म्हणून झोपून उठल्यानंतर सर्वात पहिले शरीराला नॉर्मल करावं आणि उठून जवळपास अर्धा तास झाल्यानंतर आंघोळ करावी.
  • वर्कआऊटनंतर लगेच – अनेक असे लोकं आहेत, जे वर्कआऊटनंतर लगेच आंघोळीला जातात. मात्र ही एक चुकीची पद्धत आहे. वर्कआऊट किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायम केल्यानंतर शरीरात ब्लड सर्कुलेशन खूप वाढतं. त्यामुळे पहिले आपल्या शरीराचं तापमान आणि ब्लड प्रेशर स्थिर होऊ द्यावं आणि त्यानंतर आंघोळ करावी.
  • गरम पदार्थांचं सेवन केल्यानंतर लगेच – गरम पदार्थ खाल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. कारण यादरम्यान आपल्या शरीराचं तापमान खूप वाढलेलं असतं. अशा परिस्थितीत आंघोळ केली तर शरीराला नुकसान होतं. म्हणून चहा, कॉफी किंवा कुठलंही गरम पेय, पदार्थ खाल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल होऊ द्यावं आणि नंतर आंघोळ करावी.
  •  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी